Bihar Election Result 2020 : पहिल्या तासाभरातच तेजस्वी यादवांचा करिष्मा, RJD ची मुसंडी
बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे.
Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुसंडी मारली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला. (Bihar Election Results 2020 Tejashwi Yadav ahead in first phase) हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Bihar Election Result 2020 LIVE | महागठबंधन 127 जागांवर आघाडीवर
बिहारमधील विधानसभा निकालाच्या (Bihar Election Result 2020) मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पहिल्या तासाभरात मतमोजणीच्या सुरुवातीपासून महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळाली. यावेळी BJP आणि RJD मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या. यात 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला 243 जागांसाठी मतदान झाले. (Bihar Election Result 2020 LIVE Updates)
पहिल्या तासाभरात तेजस्वी यादवांचा जलवा
बिहारच्या निकालात पहिल्या तासाभरात तेजस्वी यादव यांचाच जलवा पाहायला मिळाला. पहिल्या तासाभरात महागठबंधनने बहुमताचा आकडा गाठला, महागठबंधन 123, तर एनडीए 111 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 65 जागांसह बिहारमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या वाटेवर आहे. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे कल असल्यामुळे यामध्ये बदल होणं साहजिक आहे.
तर तेजस्वी सर्वात तरुण मुख्यमंत्री?
एक्झिट पोलमधील राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरल्यास तेजस्वी यादव हे बिहारचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. यापूर्वी वयाच्या 32व्या वर्षी देशातील कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री झालेला नाही. मतपेटीत अनेक उमेदवारांचे भवितव्य कैद झालेला असून, मंगळवारी होत असलेल्या मतमोजणीमुळे अनेक मंत्र्यांचे भवितव्य निश्चित होणार आहे.
नितीश कुमारांचा शेवट गोड होणार का?
“आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, अशा शब्दाक राजकीय संन्यासाचे संकेत देणाऱ्या नितीश कुमार यांचा शेवट गोड होणार? की तेजस्वी यादव यांच्या माध्यमातून बिहारला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. अशावेळी बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
(Bihar Election Results 2020 Tejashwi Yadav ahead in first phase)
#Breaking: Bihar Election Result Live Update: नितीशकुमार यांच्याबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतोय: प्रवीण दरेकर#BiharElection2020 #BiharPolls #Bihar #BiharElectionResults #BiharElectionResults2020 #tv9marathilivehttps://t.co/cGdJPK7WoO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
संबंधित बातम्या
Bihar Election Result : तेजस्वी भवः बिहार!; तेजप्रताप यादव यांच्या शुभेच्छा
Tejashwi Yadav: तेजस्वी यादव कोणत्या मतदारसंघातून लढतायत; कोण आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार?