नितीश कुमार मॉर्निंग वॉक करत होते, अचानक दुचाकीस्वार आला, धडक दिली, अन्…

Bihar CM Nitish Kumar Security : बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक; घातपाताचा प्रयत्न? वाचा मोठी अपडेट...

नितीश कुमार मॉर्निंग वॉक करत होते, अचानक दुचाकीस्वार आला, धडक दिली, अन्...
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 12:47 PM

पटना, बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. नीतीश कुमार मॉर्निंग वॉक करत असताना अचानक दोन दुचाकीस्वार जवळ आले. त्यांनी धडक दिली मात्र इतक्यात नीतीश कुमार फुटपाथवर चढल्याने बाईकची धडक चुकली अन् थोडक्यात अनर्थ टळला.

नेमकं काय घडलं?

नीतीश कुमार हे आज सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. सर्क्युलर रोडवर नितेश कुमार मॉर्निंग वॉक करत होते. मॉर्निंग वॉक करत असतानाच पटनातील मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात अचानक दोन बाईकस्वार घुसले. त्यांनी नीतीश कुमार यांच्याजवळ गाडी नेली. पण धोक लक्षात आल्याने नितीश कुमार हे लगेचच फुटपाथवर गेले. यामुळे ते अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.

कधी घडली घटना?

नीतीश कुमार हे त्यांच्या निवासस्थान परिसरात फेसफटका मारत होते. सकाळी 6.45 च्या असपास त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे. यातून ते बचावले आहेत.

सुरक्षेत मोठी चूक

नीतीश कुमार आपल्या निवासस्थान परिसरात असताना हे दुचाकी स्वार आत आले कसे? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर अलं आहे. या सगळ्या घटनेवर उच्च दर्जाची बैठक बोलावण्यात आली आहे. या घटनेनंतर नीतीश कुमार यांच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुणाचा हात?

या घटनेनंतर SSG अर्थात स्पेशल सिक्युरिटी गार्ड्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. SSG च्या कमांडेट आणि अधिकारी यांची तात्काळ बैठक बोलावण्यात आली आहे. बिहार पोलीसही दाखल झाले आहेत. आजच्या या घटनेमुळे घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्या मागे लहरिया कट बाईक गँगचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुचाकीस्वार ताब्यात

बिहार पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. तर या दुचाकीस्वाराची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे या दोघांच्या चौकशीनंतर काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं राहील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.