‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

भाजपने राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आज (12 ऑक्टोबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली.

'राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा', भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 5:14 PM

मुंबई : भाजपने राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आज (12 ऑक्टोबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. ठाण्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तर नागपूरमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. तसेच राज्यात तात्काळ दिशा कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली (BJP Akrosh Morcha all over Maharashtra on Violence against Women).

नवाब मलिक यांनी भाजपच्या आंदोलनांवर निशाणा साधत भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “भाजपनं त्यांच्या राज्यात‌ असलेल्या प्रश्नावर आंदोलन करावं. भाजपनं त्यांच्या कार्यकाळात काय केलं तेही पाहावं. या सरकारविरोधात बोलायला विषय नाही म्हणून भाजप आंदोलन करत‌आहे, पण त्यांना आंदोलन करण्याचाही नैतिक‌ अधिकार नाही.”

ठाणे

आशिष शेलार यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत निवेदन दिलं. ते म्हणाले, “राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात भाजपने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढला आहे. ठाण्याच्या आंदोलनात मी आज सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.”

पुणे

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपच्यावतीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनास भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उत्तरपरदेशातील हाथरसच्या घटनेचाही यावेळी निषेध करण्यात आला. तसेच आघाडी सरकार हाथरसच्या घटनेचा निषेध करताना राजकारण करत असून राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

यावेळी राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करावा, केंद्र सरकारने महिलांविरोधातील अत्याच्याराविरोधात जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

नाशिक

महिलांवरील अत्याचार विरोधात नाशिकमध्ये भाजपच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकमधील इंदिरा नगर परिसरातील आंदोलना दरम्यान मात्र गोंधळ झाला. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलना पूर्वीच पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. जमावबंदी आदेश असल्याचं सांगत पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं. दरम्यान यावेळी आलेल्या आमदार देवयानी फरांदे आणि पोलीस अधिकारी यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

निफाड

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर झाल्याचा आरोप करत निफाड येथे भाजप महिला मोर्चाच्यावतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी निफाड बाजार समिती आवार ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महिला सुरक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन निफाड उपविभागीय अधिकारी व तहसीलदार त्यांच्याकडे देण्यात आले.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर भारती पवार म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाची सत्र सुरू झाले आहेत. कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरू झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.”

खासदार डॉक्टर भारती पवार व भारतीय जनता महिला मोर्चा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुवर्णा जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूर

राज्यात वाढत्या महिला अत्याचाराविरोधात भाजपने नागपूरमध्ये देखील आंदोलन केलं. नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही भाजपच्या महिला आघाडीने राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. “राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असून सरकार महिला आणि मुलींवरील अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरलंय,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

सोलापूर

सोलापुरात भाजप महिला मोर्चाने महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन केलं. यावेळी सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहेत. कोरोना काळात तर कोविड सेंटरमध्येच महिलांवर अत्याचार झाल्याचे प्रकार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिसून आले. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यभर भाजप महिला मोर्चाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.”

सोलापुरात भाजप महिला मोर्चाकडून महापौर श्रीकांचनम्मा यन्नमी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.”उद्धवा जागे व्हा” अशी घोषणाबाजीही यावेळी भाजपा महिला मोर्चाकडून करण्यात आली.

मुरबाड

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप महिला आघाडीतर्फे मुरबाड तहसिलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात आघाडी सरकारला आलेल्या अपयशाचा निषेध आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कडक कायदे तयार करावे या मागणीसाठी भाजप महिला आघाडीतर्फे मुरबाड तहसिलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा

भाजपने बुलडाणा येथीही महिला अत्याचाराविरोधात आंदोलन केले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भाजप महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्व महिला आघाडीतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

वाशिम

भाजप महिला आघाडीने वाशिममध्ये देखील सरकार विरोधात आक्रोश आंदोलन केलं. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच झोपेचे सोंग घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आल्याची भूमिक मांडण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला.

औरंगाबाद

राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज औरंगाबाद शहरात भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आले. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात भाजपच्या शेकडो महिलांनी एकत्र येऊन तीव्र निदर्शने केली. यावेळी भाजपच्या महिलांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

औरंगाबाद शहरात आरपीआय आठवले गटाच्या वतीने देखील जोरदार निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आरपीआयच्या शेकडो कार्यकर्त्यानी एकत्र येत ही निदर्शने केली. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

कोल्हापूर

राज्यातील महिला अत्याचाराविरोधात कोल्हापुरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने माळकर तिकटी येथे रास्ता रोको करण्यात आला. यात महिला पदाधिकारी युवती तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी महिला अत्याचाराला आळा घालण्यात महाविकासआघाडी अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या :

UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

रायगडमध्ये मजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ठेकेदारावर अ‍ॅट्रोसिटी, बलात्काराचा गुन्हा दाखल

रामदास आठवलेंकडून आरे कॉलनीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट, 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा

BJP Akrosh Morcha all over Maharashtra on Violence against Women

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.