संजय ‘राऊत’ नाही, संजय ‘पराभूत’, आशिष शेलारांची शेलकी टीका
संजय राऊत कळीचा नारद आहे असे दिसतं. खरं तर आम्ही त्यांना संजय राऊत नाही पराभूत म्हणतो." असेही आशिष शेलार (Ashish Shelar criticizes sanjay raut) म्हणाले.
मुंबई : “शिवेसना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांशी सलगी केली आणि पवार कुटुंबात कलह निर्माण (Ashish Shelar criticizes sanjay raut) केला. ज्यांनी पक्षात कलह केला. ज्यांनी मित्रपक्षात कलह निर्माण केला. ज्यांनी पवारांच्या कुटुंबात कलह निर्माण केला अशा संजय राऊतांना वर्षाअखेरीस कलहकार पुरस्कार द्यावा लागेल,” अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी (Ashish Shelar criticizes sanjay raut) केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. यावेळी संजय राऊतांवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, “गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सत्ता कलह सुरु आहे. या सत्ताकलहाचा कळीचा नारद कोण हे जर शोधलं तर संजय राऊत कळीचा नारद आहे असे दिसतं. खरं तर आम्ही त्यांना संजय राऊत नाही पराभूत म्हणतो.” असेही आशिष शेलार (Ashish Shelar criticizes sanjay raut) म्हणाले.
“ज्वलंत हिंदूत्वाच्या नावावर काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्ते शिवसैनिकाच्या जीवावर चालणारा शिवसेना पक्ष आहे. त्या पक्षात सत्तेच्या हव्यासापोटी संजय राऊत यांनी पक्षांतर्गत कलह निर्माण केला. शिवसेना भाजप युती ही गेल्या अनेक वर्षापासून आहे. मात्र संजय राऊत यांनी रोज विनाकारण टीका टिप्पणी करुन दोन्ही पक्षांमध्ये कलह केला. दोन पक्षांच्या मैत्रीत कलह निर्माण केला,” असेही ते म्हणाले.
“संजय राऊत यांनी शरद पवारांशी सलगी केली आणि आता त्यांच्या कुटुंबात कलह केला. ज्यांनी पक्षात कलह केला. ज्यांनी मित्रपक्षात कलह केला. ज्यांनी पवारांच्या कुटुंबात कलह केला. त्या संजय राऊतांना वर्षाअखेरीस कलहकार पुरस्कार द्यावं लागेल. त्यामुळे संजय राऊत कमी बोलले तर महाराष्ट्राचं हित येईल,” अशीही टीकाही आशिष शेलार यांनी (Ashish Shelar criticizes sanjay raut) संजय राऊतांवर केली.
तसेच “जयंत पाटील यांची विधीमंडळ गटनेतेपदी झालेली नियुक्ती अवैध असल्याचेही आशिष शेलार म्हणाले. अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी झालेली नियुक्ती ही आज घेतलेल्या निर्णयाने ती अवैध होऊ शकत नाही. याउलट जयंत पाटील यांची आजची निवड अवैध ठरते कारण ती सर्व आमदारांच्या उपस्थितीत झालेली नाही,” असेही शेलार म्हणाले.