मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, भातखळकरांचा घणाघात
मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, अशा शब्दात भातखळकरांनी ठाकरे सरकारवर प्रहार केलाय.
मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळालीय. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात, अशा शब्दात भातखळकरांनी सरकारवर प्रहार केलाय. (Bjp Atul Bhatkhalkar Slam Mahavikas Aaghadi Govt over Builders premium Discount)
“500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करत सूट देण्याच्या घोषणेवरुन मा.मु उद्धव ठाकरे यांनी घुमजाव केले. मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली, परंतु बिल्डर्सना मात्र प्रीमियम मधून सूट दिली. कारण मुंबईकर कर भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात. निर्लज्ज सरकार”, असं ट्विट करत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करत सूट देण्याच्या घोषणेवरून मा.मु उद्धव ठाकरे यांनी घुमजाव केले. मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली, परंतु बिल्डर्सना मात्र प्रीमियम मधून सूट दिली. कारण मुंबईकर कर भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात. निर्लज्ज सरकार.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 6, 2021
“बिल्डरांची ‘अर्थपूर्ण मर्जी’ सांभाळण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के इतकी घसघशीत सूट देणाऱ्या ठाकरे सरकारला सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराला आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात सूट देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी घरांच्या किंमती आता किती कमी होणार..?, महापालिकांच्या महसूलात होणारी घट आता कशी भरुन काढणार?”, असे सवाल करत आम्ही सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारत राहू, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
“कोरोना महामारीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईतील गरिबांना व सामान्य नागरिकांना फायदा मिळू शकेल असे निर्णय घेण्याची आवश्यकता असताना सुद्धा ठाकरे सरकारने मागील काही काळापासून बिल्डरांना फायदा मिळेल असे निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे”, असं भातखळकर म्हणाले.
“काही विशिष्ट बिल्डरांच्या जागा असलेल्या आणि प्रकल्प सुरु असलेल्या विभागामध्ये विशेष झोन निर्माण करून त्यांना रेडिरेकनर दरात 73 टक्क्यांपर्यंत सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ज्यामुळे 10 ते 15 हजार कोटी रुपयांचा सरकारचा महसूल बुडणार आहे. हा निर्णय ताजा असतानाच आज पुन्हा एकदा बिल्डरांना खुश करण्यासाठी सरकारने बिल्डरांच्या प्रीमियम मध्ये तब्बल 50 टक्के इतकी सूट दिली आहे. ज्यामुळे सरकारला हजारो कोटी रुपयांच्या महसूलाला मुकावे लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना सुद्धा बिल्डरांना इतकी सूट कशासाठी दिली जात आहे?”, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
ठाकरे सरकारने हे दोन्ही निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास भारतीय जनता पार्टीकडून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील भातखळकर यांनी दिला आहे.
या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता, पण सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. (Bjp Atul Bhatkhalkar Slam Mahavikas Aaghadi Govt over Builders premium Discount)
हे ही वाचा
ठाकरे सरकारचे महत्त्वाचे 8 निर्णय; विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत मिळणार
सोनिया गांधी आणि मायावतींना भारतरत्न द्या, काँग्रेस नेत्याच्या मागणीवर अतुल भातखळकर म्हणतात….