AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत जाऊन पहिलं भाषण करत कांचन कुल यांचा पार्थ पवारांना टोला

बारामती : मागील काही वर्षांपूर्वी मृणाल गोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ‘दिल्लीवाली बाई गल्ली मे आणि पाणीवाली बाई दिल्ली मे’ अशी घोषणा दिली जायची. मात्र आता ‘कांचन ताई दिल्ली मे आणि सेल्फीवाली बाई गल्ली मे’ हीच घोषणा देऊन काम करायचं, अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलम गोर्‍हे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला […]

बारामतीत जाऊन पहिलं भाषण करत कांचन कुल यांचा पार्थ पवारांना टोला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

बारामती : मागील काही वर्षांपूर्वी मृणाल गोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ‘दिल्लीवाली बाई गल्ली मे आणि पाणीवाली बाई दिल्ली मे’ अशी घोषणा दिली जायची. मात्र आता ‘कांचन ताई दिल्ली मे आणि सेल्फीवाली बाई गल्ली मे’ हीच घोषणा देऊन काम करायचं, अशा शब्दात शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलम गोर्‍हे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

काहीजण रागावले की शिव्या देतात, मात्र एकजण घरातला टीव्हीच फोडतात, असं सांगत त्यांनी हे गुपित कोणाबद्दल आहे हे तुम्हाला कळलंच असेल, त्याचवेळी कांचन कुल यांनी चांगलं भाषण केलं, मात्र पार्थ पवार यांना लिहून दिलेलं भाषणही वाचता आलं नाही असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, मी नवखी आणि मला संसदीय कामाची माहिती नसेल असं लोकांना वाटत असेल. पण आमचे गुरु गिरीश बापट आणि महागुरु नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी कच्चे कसे राहतील, अशा शब्दात भाजप उमेदवार कांचन कुल यांनी टीकाकारांना प्रत्त्युत्तर दिलं.

बारामतीत आज भाजप महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गोर्‍हे, बाळा भेगडे, भीमराव तापकीर, राहुल कुल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना निलम गोर्‍हे यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. मृणाल गोरे या लोकसभेला उभ्या असताना दिल्लीवाली बाई गल्ली मे आणि पाणीवाली बाई दिल्ली मे अशा घोषणा दिल्या जायच्या, आता मात्र कांचनताई दिल्ली मे आणि सेल्फीवाली बाई गल्ली मे अशी घोषणा देत आपण काम करायचं असं त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या भाषणाचीही खिल्ली उडवली. आपल्याला एक चिठ्ठी आलीय, ज्यात कांचन कुल यांनी लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर न चुकता पहिल्यांदा भाषण केलंय. मात्र पार्थ अजित पवार यांना लिहिलेलं भाषणही नीट वाचता न आल्याचं नमूद केलंय. त्यावरुन बारामतीकरांचं निरीक्षण अगदी योग्य असल्याचं आमदार निलम गोर्‍हे यांनी सांगितलं. त्यालाच अनुसरुन काही जण राग आला तर शिव्या देतात. मात्र एक व्यक्ती अशीय जी स्वत:च्या घरातला टीव्ही फोडते.. हे गुपित नेमकं कोणाबद्दल हे उपस्थितांना कळलंय.. त्यामुळं आपले टीव्ही सांभाळा, असा सल्ला देत त्यांनी उपस्थितांची उत्कंठता वाढवली. टीव्ही नेमका कोणी आणि कोणाच्या घरी फुटला याबद्दल आता चर्चांना उधाण आलंय.

याच कार्यक्रमात माजी आमदार शरद ढमाले यांनी निलम गोर्‍हे यांना एक मुद्दा सांगितला. मात्र त्यावर तुमचं नाव शरद असल्यामुळे तुमच्या भविष्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला. पुढे काय व्हायचंय ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडू, असंही म्हणायला त्या विसरल्या नाहीत.

भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज बारामतीत प्रथमच भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी कुल कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मी नवखी उमेदवार आहे, मला संसदीय कामाचा अनुभव नाही असं म्हणतात. परंतु आमचे गुरु गिरीश बापट, तर महागुरु नरेंद्र मोदी आहेत.. त्यामुळं त्यांचे विद्यार्थी तरी कसे कच्चे राहतील असं म्हणत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.. मी बारामतीची लेक आणि दौंडची सून असून आपण मला मतरुपी आशीर्वाद द्यावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.