भाजपचा उमेदवार नववी पास तर ऋतुजा लटकेंकडे B.com ची डिग्री; सर्वात जास्त संपत्ती कुणाकडे?

दोन्ही गटाच्या उमेदवारांचे शिक्षण आणि त्यांची मालमत्ता चर्चेत आली आहे.

भाजपचा उमेदवार नववी पास तर ऋतुजा लटकेंकडे B.com ची डिग्री; सर्वात जास्त संपत्ती कुणाकडे?
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 11:08 PM

मुंबई : मशाल पेटवत ठाकरे गटाने प्रचार सुरु केला आहे. अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत, ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके लढतायत. भाजपकडून मुरजी पटेल मैदानात आहेत. या निवडणुकीत मनसेनं स्वत:चा उमेदवार दिलेला नाही. पण, पाठींब्यावरुन, आता थेट शिंदेसोबत चर्चा झाल्याचं कळतय. या निमित्ताने दोन्ही गटाच्या उमेदवारांचे शिक्षण आणि त्यांची मालमत्ता चर्चेत आली आहे.

अंधेरी पूर्वची विधानसभेची पोटनिवडणूक, उद्धव ठाकरेंबरोबरच शिंदे-भाजप सरकारसाठी कसोटी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताच, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंनी प्रचारही सुरु केला.

तर, भाजपचे उमेदवार मुरजी पटेलांच्या उमेदवारी अर्जावरच ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. मुरजी पटेलांना मुंबई महापालिकेनं 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यापासून बाद केले आहे.

मग एखाद्या व्यक्तीवर 6 वर्षांसाठी बंदी घातली तर मग, तो व्यक्ती विधानसभेची निवडणूक कशी लढवू शकतो, असा सवाल संदीप नाईकांनी केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, भाजपचे मुरजी पटेल आणि ऋतुजा लटकेंची संपत्तीही समोर आलीय..उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रानुसार दोघांची संपत्ती आणि शिक्षण

मुरजी पटेल, भाजप उमेदवार

  1. मुरजी पटेलांचं शिक्षण 9 वी पर्यंत झालंय
  2. 5 कोटी 41 लाखांची संपत्ती मुरजी पटेलांच्या नावावर आहे
  3. तर 5 कोटींची संपत्ती मुलांच्या नावावर आहे
  4. अंधेरीत 3 फ्लॅट, गुजरातच्या कच्छमध्ये 30 एकर जमीन
  5. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 2 कोटींचं कर्ज आहे
  6. एकूण संपत्ती 10 कोटी 41 लाखांची आहे

ऋतुजा लटके, ठाकरे गटाच्या उमेदवार

  1. ऋतुजा लटके कॉमर्समधून पदवीधारक आहे
  2. ऋतुजा लटकेंकडे 4 लाख 89 हजारांची जंगम मालमत्ता आहे
  3. लटकेंच्या मुलांच्या नावावर 12.35 एकर जमीन आहे
  4. ऋतुजा लटकेंच्या नावावर 15 लाख 29 हजाराचं गृह कर्ज आहे
  5. दिवंगत पती रमेश लटकेंची मालमत्ता ऋतुजांच्या नावावर अजून व्हायची आहे

अंधेरीची पोटनिवडणूक ठाकरे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारसाठी प्रतिष्ठेची झालीय…आणि अंधेरी पूर्वची जनता 3 नोव्हेंबरला मतदानाच्या माध्यमातून फैसला करणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.