AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीएसटी परतावा दिला, आता पेट्रोलचे दर कमी करा, भाजपचं राज्य सरकारला आव्हान; नेटकरी म्हणतात हे त महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे!

उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारी ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असा सवाल भाजपकडून करण्यात आलाय. त्यावर नेटकरी भडकल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं उपकार केला नाही, हा महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा आहे, अशा कमेंट्स भाजपच्या ट्वीटवर पाहायला मिळत आहेत.

जीएसटी परतावा दिला, आता पेट्रोलचे दर कमी करा, भाजपचं राज्य सरकारला आव्हान; नेटकरी म्हणतात हे त महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे!
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदीImage Credit source: TV9
| Updated on: Jun 01, 2022 | 9:37 AM
Share

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या (Inflation) झळा सोसाव्या लागत आहेत. केंद्रानं कर कमी केल्यानंतर आता राज्यानं पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करावा असं आव्हान भाजप नेत्यांकडून दिलं जातं. त्यावेळी केंद्र सरकारनं जीएसटी रक्कम महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केली जाते. अखेर केंद्रकडून जीएसटी भरपाईपोटी महाराष्ट्राला 14 हजार कोटी इतकी रक्कम सुपूर्द केली आहे. केंद्र सरकारकडून 31 मे 2022 पर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना वितरीत करण्यात आली आहे. त्यावरुन भाजपनं पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला डिवचलं आहे. उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारी ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर (Fuel Tax) कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असा सवाल भाजपकडून करण्यात आलाय. त्यावर नेटकरी भडकल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं उपकार केला नाही, हा महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा आहे, अशा कमेंट्स भाजपच्या ट्वीटवर पाहायला मिळत आहेत.

भाजपचं महाविकास आघाडी सरकारला आव्हान

केंद्राने महाराष्ट्राचा तब्बल 14, 145 कोटी रुपयांचा GST परतावा दिला आहे, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीमती निर्मला सीतारमण यांचे खूप खूप आभार, उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारी ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असा खोचक सवाल भाजपच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलाय.

नेटकरी भडकले, म्हणाले उपकार केला काय?

त्यावर नेटकरी भडकल्याचं पाहायला मिळत आहे. कुणाच्या बापाचे पैसे नसून इथल्या जनतेचेच पैसे आहेत. काही उपकार केले नाहीत! अशी प्रतिक्रिया एकाने दिलीय.

तर हे महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे आहेत. मोदींनी काही उपकार नाही केले महाराष्ट्रावर. जीएसटीचे पैसे वेळेवर देता येत नाही याची लाज वाटली पाहिजे. जाहिराती काय करता? असा प्रश्नही एकाने विचारला आहे.

एकाने तर पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केलीय. ट्वीट तर एवढ्या रुबाबात केलंय जणू काही मोदींनी आणि त्या सीतारामण यांनी काही उपकार केले आहेत. हेच पैसे आधी का नाही पोहोचले सरकारपर्यंत? असा सवालही त्याने केलाय. तर उपकार केले का? म्हणजे जे मुख्यमंत्री बोलत होते ते खरे ठरले, पैसे वेळेवर देत नाही केंद्र सरकार, असंही एकाने म्हटलंय.

एकूण 86,912 कोटींचा परतावा

एकूण 21 राज्यांना केंद्र सरकारकडून जीएसटी परतावा देण्यात आला आहे. यात महाराष्ट्र गोव्यासह गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचाही समावेश आहे. 21 राज्यांचा मिळून एकूण 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून वितरीत करण्यात आला आहे. यात सर्वाधित जीएसटी परतावा हा महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.