भाजपविरुद्ध कितीही षडयंत्र रचलीत, तरी तुम्ही यशस्वी होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचे रामराजे निंबाळकरांना पत्र

चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिलं आहे.(BJP Chandrakant Patil letter to Council chairman Ramraje Nimbalkar) 

भाजपविरुद्ध कितीही षडयंत्र रचलीत, तरी तुम्ही यशस्वी होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचे रामराजे निंबाळकरांना पत्र
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 8:32 PM

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. “दुजाभाव आणि प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे. पण भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल. भाजपा विरूद्ध तुम्ही कितीही षडयंत्र रचलीत, तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (BJP Chandrakant Patil letter to Council chairman Ramraje Nimbalkar)

चंद्रकांत पाटील यांचे पत्र

“चार वर्षांपूर्वी आपण सभापती म्हणून निवडताना आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. पण आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. पण आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.

करोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात 78 च्या ऐवजी 60 सदस्य उपस्थित, तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे.

एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो राजकारणात हे चालायचंच….,” असे चंद्रकांत पाटील यांनी रामराजे निंबाळकर यांना लिहिल्यात पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली : प्रवीण दरेकर

भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत वाढली होती. मात्र आपल्याला कोर्टाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु केली आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली.

भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो” असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले. (BJP Chandrakant Patil letter to Council chairman Ramraje Nimbalkar)

संबंधित बातम्या : 

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज, डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड

विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत, भाजपची हायकोर्टात धाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.