Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशोमती ठाकूरांना मंत्रिमंडळाबाहेर काढल्यास काँग्रेस पाठिंबा काढेल, अशी ठाकरेंना भीती : चंद्रकांत पाटील

यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप आंदोलन करत राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं

यशोमती ठाकूरांना मंत्रिमंडळाबाहेर काढल्यास काँग्रेस पाठिंबा काढेल, अशी ठाकरेंना भीती : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 11:35 AM

अमरावती : महिला आणि बालकल्याण मंत्री, तसेत अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलनादरम्यान केली. (BJP Chandrakant Patil Protest at Amaravati for Congress Minister Yashomati Thakur resignation)

यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यानेच ते यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेत नाहीत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप आंदोलन करत राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा मिळाला आहे. यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. आठ वर्ष जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यशोमती ठाकूर यांना 15 ऑक्टोबरला तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला.

“गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा”

“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे तर त्यांनी स्वत:च या प्रकरणात आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तो त्यांनी दिलेला नाही. म्हणूनच भाजप आज त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आंदोलन करेल’ असं भाजपचे शिवराय कुलकर्णी म्हणाले होते. (BJP Chandrakant Patil Protest at Amaravati for Congress Minister Yashomati Thakur resignation)

दुसरीकडे भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुरांवर ट्विटच्या माध्यमातून बोचरा वार केला आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या विद्यमान मंत्री यशोमती ठाकुर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल? असा निशाणा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुर यांच्यावर साधला होता.

संबंधित बातम्या :

मंत्री यशोमती ठाकूर यांना दिलासा, पोलीस कॉन्स्टेबल मारहाण प्रकरणी तीन महिन्यांच्या शिक्षेला स्थगिती

गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, भाजप आक्रमक

मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, चंद्रकांत पाटलांची मागणी

(BJP Chandrakant Patil Protest at Amaravati for Congress Minister Yashomati Thakur resignation)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.