चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी होती.  (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility) 

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 1:32 PM

नागपूर : विधानसभा निवडणुकीत डावलले गेलेले भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून पुन्हा नवी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांसाठी नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचाराची जबाबदारी होती.  (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility)

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंवर भाजपकडून नवी जबाबदारी सोपवली आहे. यानुसार बावनकुळेंची नागपूर पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर इतर नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता ही नवी जबाबदारी दिल्याने चंद्रशेखर बावनकुळेंचं पक्षात महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर

दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.

“नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेन. सहा महिन्यांपासून काम सुरु होते. भाजपचा गड कायम राखण्याचा प्रयत्न राहील” अशी ग्वाही  संदीप जोशी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. (BJP Chandrashekhar Bawankule Get New responsibility)

संबंधित बातम्या : 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

राज्यातही निवडणुकांचा श्रीगणेशा; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला मतदान

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.