आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ईट का जवाब पत्थर से देंगे, बावनकुळेंचा इशारा
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसैनिकांनी आक्रमक होत विविध शहरातल्या भाजप कार्यालयांवर हल्ले चढवले. कुठे दगडफेक झाली तर कुठे सेना-भाजप कार्यकर्ते भिडले. पुणे-नाशिक-अमरावतीच्या भाजप कार्यालयांवर सेनेचे कार्यकर्ते चाल करुन गेले. याच आक्रमक सेना कार्यकर्त्यांना भाजपनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. आता जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
‘ईट का जवाब पत्थर से देंगे’
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलाच राडा झाला. जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नसून ईट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच तोफ डागली. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथून पुढे जशास तसं प्रत्युत्तर देतील, असं ते म्हणाले.
डिसेंबरपूर्वी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा नाहीतर फिरु देणार नाही
डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडी च्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये दिला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात एक हजार कोटीचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्या समक्ष झाला आहे. या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केलीय, अशी माहिती सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सुद्धा बावनकुळे यांनी केली.
(BJP Chandrashekhar Bawankule Warning Shivsena karykarta)
हे ही वाचा :
अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक; प्रताप सरनाईकांना विचारताच म्हणाले, मी स्वत:च अडचणीत