साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ

मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला... या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ
उद्धव ठाकरे आणि चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 12:10 PM

नाशिक : “साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?, असं प्रश्न करत आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुमचं व्यक्तीमत्व सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.  (BJP Chitra Wagh Appeal To Cm Uddhav thackeray Over Sanjay Rathod Case)

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत नाही.

“मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, साहेब तुमच्यावर प्रेशर नाही ना? धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी दबाव तर नाही ना. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का हो? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत नाही. आपण शिवयारायांचा महाराष्ट्र म्हणता ना मग आता तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे”, असं आवाहन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या

“मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच राजीनामा घेईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तोपर्यंत लढत राहणार, आणि बोलतच राहणार”, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

…तर आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून घेण्यास समर्थ नाही

“आज आम्ही जर पुजाच्या न्यायासाठी जर उभा राहिलो नाही, तर आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून घेण्यास समर्थ नाही. पुरोगामी महाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच केसेस? पण केसेस दाखल जरी झाल्या तरी आम्ही प्रश्न विचारतच राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन”, असंही त्या म्हणाल्या.

(BJP Chitra Wagh Appeal To Cm Uddhav thackeray Over Sanjay Rathod Case)

हे ही वाचा :

अरुण राठोडने कबुली जवाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?, चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप; चौकशीची मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.