राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्ला

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women Commission ) रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव न घेता केलाय.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर हल्ला
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 10:03 AM

मुंबई :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women Commission ) रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव न घेता केलाय. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव निश्चित झालंय. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच आज सकाळीच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवलाय.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका

महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही. पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.

चित्रा वाघ- रुपाली चाकणकर अनेक वेळा आमने-सामने

धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत पक्षातील नेत्यांसाठी बॅटिंग केली होती. आरोप होत असतात, चौकशी होते आणि दोषी असेल तर न्यायालय शिक्षा देतं, तुम्ही त्यांना अगोदरच दोषी का ठरवताय? असे सवाल चाकणकर सातत्याने भाजप नेत्यांना विचारत राहिल्या. अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याच प्रकरणांवरुन खडाजंगीही झाली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच किंबहुना अधिकृत घोषणेच्या शक्यतेअगोदरच चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवून दोघींमधल्या वादाच्या पुढच्या अंकाची कशी सुरुवात होणार आहे, याची झलक दाखवून दिलीय.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”

रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी, आज अधिकृत घोषणेची शक्यता!

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे.

गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. महिला अत्याचारांवरुन विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आघाडीतील महिला नेत्याची वर्णी लागणार, अशी चर्चा होती. अखेर काल (बुधवार) रात्री उशिरा चाकणकर यांच्या खांद्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देणार अससल्याचं वृत्त आलं.

आक्रमक नेत्या म्हणून चाकणकर यांची ओळख

रुपाली चाकणकर यांची ओळख आक्रमक नेत्या म्हणून आहे. सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात. अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर.

रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.

शेतकरी कुटंबात जन्म, अपघाताने राजकारणात, आता पक्षाचा प्रमुख चेहरा!

दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.

नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेललीय.

(BJP Chitra Wagh Attacked NCP Rupali Chakankar Over State Women Commission President Post)

हे ही वाचा :

Rupali Chakankar : अखेर ठरलं; रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.