सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात ती पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता.

सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 8:57 AM

नाशिक: शिवसेनेला जोरदार धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप यांना सोमवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BJP corporators are upset over Balasaheb Sanap’s entry into the party)

बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात ती पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता. मात्र, त्यानंतरही सोमवारी मुंबईत सानप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर आता नाशिक भाजपात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा गृहकलह निर्माण होण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत.

सानपांच्या प्रवेशाचा निर्णय 10 मिनीटात!

. बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? याचा किस्सा फडणवीसांनी सानप यांच्या प्रवेशावेळी सांगितला. “दुरावलेले बाळासाहेब सानप भाजपमध्ये पुनर्प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत ज्यांचे परिश्रम आहेत, त्यात सानप येतात. काही समज-गैरसमजांमुळे अंतर निर्माण झाले, मात्र ते मनापासून आपल्यासोबतच होते. पक्षाचा एवढा मोठा नेता, ज्याच्या मनात पक्ष आहे त्यांना सोबत घ्यायला हवं, असं आम्हालाही वाटलं. आम्हाला काही निगोसिएशन्स करावी लागली नाहीत. निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आधी आणि नंतरही आमचं बोलणं होत होतं. आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे” असं फडणवीस म्हणाले.

कोण आहेत बाळासाहेब सानप ?

– भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर – भाजपमधून 2014 साली नाशिक पूर्वमधून आमदार – 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली – विधानसभा निवडणुकीत सानप यांचा पराभव – पराभवानंतर सानप यांचा शिवसेनेत प्रवेश – नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद – गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी ओळख – नाशिक पालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानप यांचा भाजपप्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

BJP corporators are upset over Balasaheb Sanap’s entry into the party

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.