मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी; फडणवीसांचे ठाकरे सरकारला फटकारे; अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत

राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा दावा करत, हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. ( BJP criticizes state government)

मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी; फडणवीसांचे ठाकरे सरकारला फटकारे; अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 6:16 PM

मुंबई : भाजपने रविवारी (13 डिसेंबर) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरकार मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसेच कारोना महामारी या सर्व गोष्टींमध्ये समाधानकारक कामगिरी करु शकले नसल्याचा दावा केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारला चांगलंच घेरलं. सोमवरापासून ( 14 डिसेंबर) दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाची सुरुवात  होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या एक दिवस आधी विरोधीपक्षाने पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला चांगलेच घेरले. तसेच, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून, सोमवारी होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेतही विरोधकांनी दिले आहेत.

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

अधिवेशनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. “आम्ही विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी केली होती. दोन आठवडे अधिवशेन घेण्याचा आमचा आग्रह होता. पण, हे सरकार चर्चेतून पळ काढणारे आहे,” असे म्हणत,  इतिहास या सरकारची जनतेच्या प्रश्नांवर पळ काढणारे सरकार म्हणून नोंद घेईल, अशा शब्दांत फडणवीसांनी सरकारवर टीका केली.

कोरोनाकाळातील भ्रष्टाचार संतापजनक

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर भाष्य केले. “देशात कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात 48 हजार लोक कोरोनामुळं दगावले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही सर्वाधिक मृत्यू राज्यात होत आहेत. कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार संतापजनक आहे. मुख्यमंत्री म्हणतात राज्यात कोरोना लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो. मात्र, कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्र सरकार अपयशी झाल्याचे दिसते आहे,” असे फडणवीस म्हणाले.

शक्ती विधेयकावर चर्चा व्हावी

राज्य सरकारने महिला अत्याचार कमी व्हावेत. तसेच महिला अत्याचाराचे गुन्हे लवकर निकाली काढण्यासाठी शक्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यावर बोलताना, या अधिवशेनात शक्ती विधेयकावर कशी चर्चा होणार हा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. त्याबरोबरच योग्य प्रकारे या शक्ती विधेयकावर चर्चा व्हावी, अशीही मागणीही फडणवीसांनी केली. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सरकारमधील मंत्रीच आरक्षणावर प्रश्न निर्माण करतात

“महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती दिली, ही दुर्दैवाची बाब आहे. यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार आणि सरकारमधील मंत्री ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात,” असे म्हणत, सरकारमधील मंत्रीच मोर्चे काढतात याचे आश्चर्य वाटते, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सोमवारी विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याचं दिसत आहे. यावरुन हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

मुंबईकरांचा बेफिकीरपणा, विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.