BJP Delegation Meet Governor | भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील घटनांचा अहवाल कोश्यारींकडे सादर

मुंबईतील राजभवनात भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (BJP Delegation Meet Governor)

BJP Delegation Meet Governor | भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, राज्यातील घटनांचा अहवाल कोश्यारींकडे सादर
BJP Delegation Meet Governor
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 1:11 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. (BJP Delegation Meet Governor Bhagat Singh Koshyari)

भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी 9.30 वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. गेल्या तासाभरापासून भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु आहेत.

या बैठकीत राज्यपालांना राज्यात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांचा अहवाल देण्यात आला. तसेच खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे,” अशी मागणी फडणवीसांनी केली

Mumbai: Delegation of BJP leaders led by Devendra Fadnavis met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and handed over their memorandum pic.twitter.com/beeR22ZZhd

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर वेगवान घडामोडी

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले.

या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.

भाजपकडून राजीनाम्याची मागणी

तसेच परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चिलं जात आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारची बदनामी होत आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे.

‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात यांनी म्हटलं आहे.  (BJP Delegation Meet Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अटकेसाठी NCB घरी, आरोपीने अंगावर कुत्रे सोडले

परमबीर सिंग प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.