Rajya Sabha Election : भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल, फडणवीस म्हणतात, “आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!”

"आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!", असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Rajya Sabha Election : भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल, फडणवीस म्हणतात, आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:09 PM

मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Electon 2022 ) सहा जागांसाठी निवडणूक होतेय. भाजपच्या तीनही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

फडणवीस काय म्हणाले?

भाजपच्या तीनही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आमचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. शिवाय “आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. घोडेबाजार रोखायचा असेल तर महाविकास आघाडीने आपला उमेदवार मागे घ्यावा. पण जरी त्यांनी आपला उमेदावार मागे घेतला नाही तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमचे तीनही उमेदवार निवडून येतील”, असं फडणवीस म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपकडून कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक  यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अनिल बोंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अनिल बोंडेकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही काळ राज्याचे कृषीमंत्री पद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा, जमिनीवरचा नेता अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या अमरावतीच्या दंगलीत त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांच्या साठी जमेची ठरली आहे.

पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आज राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पियूष गोयल यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.