महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसेंनी सांगितलं. (Eknath Khadse wishes candidature for Vidhan Parishad Election)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत आणा, एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 7:13 PM

जळगाव : विधानसभा निवडणुकांच्या वेळी तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द खडसेंनी सांगितलं. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. (Eknath Khadse wishes candidature for Vidhan Parishad Election)

मागच्या वेळी राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होती. माझ्या नावाची शिफारस महाराष्ट्र प्रदेश भाजपने राज्यसभेसाठी केली होती. पण माझी त्यावेळी फारशी इच्छा नव्हती आणि त्या कालखंडात ते होऊ शकलं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही9’ ला दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसेंनी सांगितलं.

एकनाथ खडसे यांनी विधानसभेला तिकीट नाकारल्याबद्दल मनातील खदखद डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडावरुन जाहीर बोलून दाखवली होती. खडसेंच्या मुलीला पक्षाने विधानसभेला उमेदवारी दिली होती. मात्र रोहिणी खेवलकर यांना पराभवाचा धक्का बसला होता.

दरम्यान, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी व्यक्त केलेल्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली. ‘इच्छा व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहेच. 40 वर्ष त्यांनी भाजपच्या विस्तारासाठी प्रचंड प्रयत्न केले. जळगाव, खानदेश आणि महाराष्ट्रात पक्ष सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी निष्ठेने काम केलं आहे. पक्षाने योग्य निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. हा निर्णय महाराष्ट्र नाही, तर केंद्रीय पातळीवर होतो’ असं मुनगंटीवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे.

हेही वाचा : विधानपरिषदेच्या तिकीटासाठी मोर्चेबांधणी सुरु, विदर्भातील काँग्रेस इच्छुक नेत्यांच्या भेटीला

भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (Eknath Khadse wishes candidature for Vidhan Parishad Election)

एकनाथ खडसे यांच्याशिवाय विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजप आता खडसेंना विधानपरिषदेची उमेदवारी देणार का? आणि विधान परिषद निवडणुकीची चुरस वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

(Eknath Khadse wishes candidature for Vidhan Parishad Election)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.