‘मदर्स डे’ निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'मातृत्व' या आपल्या आवडत्या भूमिकेविषयी लिहिलं आहे. (Pankaja Munde Mothers Day Post)
मुंबई : दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. राजकीय नेते, अभिनेते यांच्यापासून सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिताना दिसतात. भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही ‘मदर्स डे’ निमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Pankaja Munde Mothers Day Post)
भाजपचे दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी पंकजा मुंडे अनेकवेळा आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. आईविषयीही अनेक वेळा त्यांनी हळवा कोपरा उलगडून दाखवला आहे. मात्र यावेळी त्यांनी ‘मातृत्व’ या आपल्या आवडत्या भूमिकेविषयी लिहिलं आहे.
“मला एकच मुलगा आहे, पण अनेकांनी; अगदी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांनी मला ‘माते’ असे शुभेच्छा मेसेज केले. गंमत वाटली आणि छान वाटलं. प्रितम जन्मली, तेव्हा प्रथम मातृत्व जाणवलं. मग यशश्री, आर्यमन, मग सर्व. मला घरात ‘मा’ असंच म्हणतात. पूनमचा मुलगा, प्रीतमचा मुलगा, सर्व ‘मा’ म्हणतात. एक भूमिका माझी आवडती…’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
मला एकच मुलगा आहे पण अनेकांनी अगदी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांनी मला माते शुभेच्छा असे मेसेज केले गंमत वाटली आणि छान वाटलं.प्रीतम जन्मली तेव्हा प्रथम मातृत्व जाणवलं मग यशश्री आर्यमन मग सर्व.मला घरात ‘मा’ च म्हणतात पुनमचा मुलगा प्रीतम चा मुलगा सर्व ‘मा’ म्हणतात.एक भूमिका माझी आवडती. pic.twitter.com/DJeHlE8GUQ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 10, 2020
दिग्गज नेत्यांकडून आईला वंदन :
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही सदैव तुझ्या आठवणीत… (Pankaja Munde Mothers Day Post)
मातृदिनानिमित्त माझ्या आईला भरपूर प्रेम आणि या भूमीवरील प्रत्येक मातेला वंदन?#motherday2020 #HappyMothersDay #MotherLove #मातृ_दिवस pic.twitter.com/BRa9ZiRpox
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 10, 2020
‘मातृ दिना’च्या निमित्ताने आजीने दिलेल्या भांड्यात आईच्याच मदतीने आज आईसाठी आल्याचा चहा बनवला. चहा साधारणच बनला होता पण ‘खूप सुंदर झाला’ असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते! #मातृदिवस pic.twitter.com/ludfW0CjVQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 10, 2020
माझ्या बाईचा (आईचा) धाक आजही तसाच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ती स्वत: मास्क लावतेच पण आपला लेक घराबाहेर पडताना मास्क लावतोय का?हेही कटाक्षाने पहाते. आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी लहानच असतो. आई तुझ्या चरणी वैकुंठ तूच माझा पांडुरंग मातृदिनाच्या मनस्वी शुभेच्छा! pic.twitter.com/k7qHAyoJ4b
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 10, 2020
(Pankaja Munde Mothers Day Post)