ठाकरे सरकारविरुद्ध वात पेटवली, मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!

धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल.

ठाकरे सरकारविरुद्ध वात पेटवली, मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 9:38 AM

मुंबई : भाजप नेते (BJP) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमय्यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांभोवती तब्बल 40 CISF जवानांच्या सुरक्षेचं कवच असेल. सोमय्यांना Z दर्जाची (Z security) सुरक्षा असेल. महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांविरुद्ध वात पेटवली आहे. त्यानंतर सोमय्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या.

या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कडं असेल.

तीन मिनिटांत कुठल्याही प्रसांगास सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात. सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Z सुरक्षा

भारत सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा पुरवल्या जातात. यामध्ये X, Y, Z, Z प्लस, अशाप्रकारच्या सुरक्षा कवचांचा समावेश आहे. झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये 22 सैनिक असतात. यामध्ये चार किंवा पाच NSG कमांडोंचा समावेश असतो. शिवाय एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचादेखील समावेश असतो.

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारमधील 11 नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

सोमय्यांकडून 11 नेत्यांची यादी जाहीर 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) हल्लाबोल केला आहे. सोमय्यांनी ठाकरे सरकारशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत.

‘उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार’

ठाकरे सरकारची लूट, बेनामी कारभारात अजून एक नाव आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा भाजपने दिलाय. आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या 

शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल

उद्धव ठाकरे इलेव्हन दिवाळीपर्यंत तुरुंगात, आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा थेट इशारा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.