डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, आशिष शेलारांचा घणाघात

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!," असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. (Ashish Shelar on Bharat Bandh Andolan) 

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, आशिष शेलारांचा घणाघात
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 12:24 PM

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. भारत बंदच्या या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी घणाघाती टीका केली आहे. “डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे. (Ashish Shelar on Bharat Bandh Andolan)

“मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

“माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत. डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

“■काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?■काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद? काँग्रेसच्या फसवणूकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये!,” असे आवाहनही आशिष शेलार यांनी जनतेला केलं आहे.

हेही वाचा – ‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (मंगळवार 8 डिसेंबर) भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे. केंद्र सरकारच्या कामगार, व्यापारी व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील ,आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक यांनी सांगितले. (Ashish Shelar on Bharat Bandh Andolan)

संबंधित बातम्या : 

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.