आशिष शेलारांनी कंबर कसली, हैदराबादेतील मराठी मतं खेचण्याचा भाजपचा प्रयत्न
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांच्याकडे भाजपचे निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी आहे
हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation (GHMC) election) भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी कंबर कसली आहे. हैदराबादमधील विविध भागात जाऊन शेलार यांनी मराठी भाषिकांशी संवाद साधला. (BJP Leader Ashish Shelar talks with Marathi Voters in Hyderabad ahead of GHMC election)
“ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात हैदराबादमधील याकतपुरा विधानसभेतील कूर्मगुडा विभागातील मराठी भाषिकांशी संवाद साधला आणि भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले” अशी माहिती आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे दिली. त्याआधी त्यांनी मलकपेठ विधानसभेतील मराठी भाषिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचारात आज हैदराबाद मधील याकतपूरा विधानसभेतील कूर्मगुडा विभागातील मराठी भाषिकांशी संवाद साधला व भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. #GHMCWithBJP pic.twitter.com/CRZhDQ4fbr
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 25, 2020
आशिष शेलार यांचा परिचय
- मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार
- अभाविपच्या मुंबई संघटनमंत्री पदाची जबाबदारी
- RSS, अभाविप मार्गे भाजपमध्ये दाखल
- 2002 ला मुंबई महापालिकेत नगरसेवक
- 2007 मध्येही मुंबई मनपात नगरसेवक
- मुंबई भाजप अध्यक्षपदाचाही अनुभव
- (BJP Leader Ashish Shelar talks with Marathi Voters in Hyderabad ahead of GHMC election)
- 2012 ते 2014 काळात विधानपरिषदेवर नियुक्ती
- 2015 मध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी
- 2017 मध्ये शरद पवारांचा पराभव करून MCA चे अध्यक्षपद मिळवले
- 2014, 2019 मध्ये विधानसभेवर निवड
- विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांशी जवळीक
- फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रिपदाची धुरा
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, तर आशिष शेलार यांच्याकडे सहप्रभारी म्हणून कार्यभार सोपवला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी, माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी पद सोपवले आहे. त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
तावडे-पंकजांनंतर आशिष शेलारांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी
जेपी नड्डांची भाजपच्या निवडणूक प्रभारींसोबत बैठक
(BJP Leader Ashish Shelar talks with Marathi Voters in Hyderabad ahead of GHMC election)