बॉलिवूड मुंबईतून कोणीही नेऊ शकत नाही, योगी आदित्यनाथ अभ्यासासाठी येत असावेत : चंद्रकांत पाटील
पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर आक्षेप असण्याचं कारण नाही," असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil On Parallel Bollywood Industry in UP)
कोल्हापूर : “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil On Parallel Bollywood Industry in UP)
“बॉलिवूड किंवा असा कोणत्याही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, तो कुठेही नेण्याचं कारण नाही. एखाद्यावेळी ते अशाच प्रकारचा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा यासाठी अभ्यासासाठी येत असावेत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“पण मुंबईतून बॉलिवूड ते नेऊ शकत नाही. तसेच मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळणं फार अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करुन एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ यांचा दौरा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (2 डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.
काँग्रेसची सणसणीत टीका
काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या सचिन सावंतांनीही योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यावर टीका केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधाण्याची शक्यता आहे. यानंतर बॉलिवूड निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथांवर केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सरकारने असं काही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले. (Chandrakant Patil On Parallel Bollywood Industry in UP)
बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; गिरीश बापट म्हणतात…https://t.co/eScwBLZNEm#girishbapat #bjp #maharashtra #Bollywood #YogiAdityanath #MahaVikasAghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या :
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
girish bapat ! बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार?; गिरीश बापट म्हणतात…