हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचे राष्ट्रवादीला आव्हान
भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही.
मुंबई: 2024 सालची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवून दाखवावी. मग कुणाला जास्त जागा मिळतात ते पाहू, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते. 2022 साली मनपा निवडणुकीत पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत, हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे वक्तव्य मिटकरी यांनी केले होते. (Chandrakant Patil give challenge to NCP)
यावर चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खुले आव्हान दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार भारतीय संस्कृतीला साजेसा नाही. दगा देऊन काहीही होऊ शकते. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात उतरुन योग्यप्रकारे लढा. 2022 कशाला 2024च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार https://t.co/lG8f4TyctY @ChDadaPatil @NCPspeaks #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
‘नाथाभाऊंना आम्ही शिकवण्याची गरज नाही’ एकनाथ खडसे हे आमचे गुरु व पालक आहेत. विनोद तावडे म्हणाले की, पक्षाकडून अन्याय झाला तर शांत राहायचं नसतं, नाराज व्हायचं नसतं. पक्ष सगळ्यांचा विचार करत असतो. या गोष्टी आम्ही नाथाभाऊंकडूनच शिकलो आहोत. त्यामुळे आता आम्ही नाथाभाऊंना शिकवण्याची गरज नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरलीhttps://t.co/nwkw1JnmMn@AjitPawarSpeaks @ChDadaPatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2020
‘या सरकारला सामान्य माणसाशी काहीही देणेघेणे नाही’ राज्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये दारुण परिस्थिती आहे. या सरकारला सामान्य व्यक्तीशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त स्वत:ची खुर्ची टिकवणं आणि सन्मान टिकवणं एवढीच चिंता वाटते. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. विदर्भात अतिवृष्टी झाली. हे सरकार येण्याआधी अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना 25 हजार आणि 50 हजार मदत देणार, अशा घोषणा करण्यात आल्या. त्याचं काय झालं?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच; अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
(Chandrakant Patil give challenge to NCP)