अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

कर्नाटकातील मराठी भाषिक गावं ही महाराष्ट्रात आली पाहिजेत," अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 12:40 PM

पुणे : “सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख दूर करतील,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकारमधील अंतर्गत कुरबुरी समोर येत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री निधी देत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता दीपक केसरकरांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

“शिवसेना नेते दीपक केसरकर यांची नाराजी त्यांचे पक्षप्रमुख म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूर करतील. मात्र अशोक चव्हाण असू दे किंवा दीपक केसरकर यांची नाराजीही काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली ६२ वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक गावं ही महाराष्ट्रात आली पाहिजेत,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“तसेच मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी यांच्यातील संघर्ष दुर्दैवी आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले, तर गावोगावी भांडणं लागतील,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दीपक केसरकरांची नाराजी 

महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर केसकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे दीपक केसरकर सत्ताकेंद्रापासून दूर फेकले गेले होते.  दीपक केसरकर तेव्हापासून जवळपास राजकीय अज्ञातवासात गेले होते. मात्र, शनिवारी त्यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली नाराजी बोलून दाखवली.

“मला स्वत:चे नाही पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेल्याचे दु:ख वाटते. यापूर्वी मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही बाब माहिती आहे. पण तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही,” असे दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

दरम्यान काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे चव्हाण यांनी म्हटले होते. (Chandrakant Patil On Deepak Kesarkar And Ashok Chavan Dissatisfaction)

संबंधित बातम्या : 

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.