आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या

याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या
चित्रा वाघ अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 4:11 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही. अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.

अनिल देशमुखांचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरुन आपण राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केलाय. राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. इतकच नाही तर CBI ने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

राजीनामा पत्रं, जसंच्या तसं

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय,

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

(Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

Anil Deshmukh resign: देशमुखांनी राजीनामा देतो सांगताच पवारांनी एका सेकंदात होकार दिला; नेमकं काय घडलं? वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.