दीपालीच्या आत्महत्येला शिवकुमार एकटा जबाबदार नाही, रेड्डीविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ
महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई : महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आत्महत्येसाठी अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांना जबाबदार धरत त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय. तसेच या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निःष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावा, असंही नमूद केलंय. त्या रविवारी (28 मार्च) पत्रकार परिषदेत बोलत होत्या (BJP leader Chitra Wagh demand FIR against Forest officer reddy in Deepali Chavan suicide case).
चित्रा वाघ म्हणाल्या, “दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार एकटा जबाबदार नाही. दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमारला वेळोवेळी पाठिशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. मात्र, सरकारने रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिले आहे. दीपाली चव्हाण यांची या व्यवस्थेने हत्या केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करून अटक करावी.”
मैत्रिणींनो लढा गं मरू नकात….
आज होलिकामातेला प्रार्थना आमच्या सगळ्या विवंचना डिप्रेशन त्रास तुझ्या पोटात धेऊन खाक कर माते…..उद्याचा नविन दिवस नविन उमेद नविन ताकत घेऊन येणारा असू दे……?#Holi pic.twitter.com/XhtyV3qbu8
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 28, 2021
“शिवकुमार यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यावर त्यांच्या जामिनासाठी पुरेपुर प्रयत्न केले जातील. त्यामुळे शिवकुमारसह रेड्डी यांच्यावरही 302 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
‘राणा यांच्या तक्रारीकडे रेड्डी आणि राठोडांनी दुर्लक्ष केले’
चित्रा वाघ म्हणाल्या, “दीपाली चव्हाण यांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. तसेच शिवकुमार यांच्याबद्दलच्या दीपाली चव्हाणच्या तक्रारी सांगितल्या होत्या. नवनीत राणा यांनी या संदर्भात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनाही पत्र पाठवले होते. मात्र राणा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले.”
“शिवकुमार आणि अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांचे मित्रत्वाचे संबंध लक्षात घेता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडून हा तपास काढून घ्यावा,” अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.
हेही वाचा :
RFO दीपाली चव्हाण प्रकरणात विनोद शिवकुमारांच्या निलंबनाचा प्रस्ताव, तर रेड्डी यांची उचलबांगडी
RFO दीपाली चव्हाण प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करा, खासदार नवनीत राणांची मागणी
नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता: रुपाली चाकणकर
व्हिडीओ पाहा :
BJP leader Chitra Wagh demand FIR against Forest officer reddy in Deepali Chavan suicide case