Chitra Wagh : ‘काँग्रेस प्रवक्ते बोलतात मराठी माणसाने बलात्कार केला, तुमची….’ चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Chitra Wagh : बदलापूरच्या ज्या शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेच्या व्यवस्थापन व संचालक पदावर सर्वपक्षीय लोक आहेत. "जनार्दन घोरपडे हे शिवसेनेचे आहेत. मनोहर आंबवडे हे उबाठाचे नेते आहेत. यामध्ये फक्त भाजप किंवा संघाचे लोक नाहीत, तर सर्वपक्षीय लोक आहेत" असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh : 'काँग्रेस प्रवक्ते बोलतात मराठी माणसाने बलात्कार केला, तुमची....' चित्रा वाघ काय म्हणाल्या?
चित्रा वाघ
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 12:58 PM

“उद्या मविआने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक दिली आहे. काही घटनांची आठवण त्यांना करून द्यायची आहे. कुठेही अशी घटना घडली तर ती राज्यासाठी लज्जास्पद आहे. सरकार म्हणून सरकार कुठे कमी पडले नाही. ज्या ज्या गोष्टी हव्या, त्या तात्काळ केल्या. एसआयटी स्थापन केली. ज्या पोलिसांनी कारवाईत कसूर केली, त्यांना निलंबित केले. उज्ज्वल निकम सारख्या वकिलांची नेमणूक केली. लहान मुलीकडून माहिती घेणे पोलिसांसाठी टास्क आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या. भाजपाच्या महिला आघाडीच्या त्या नेत्या आहेत.

“संस्था भाजपची आहे, असे तोंडसुख घेतले. ठाकरे, तुतारीवाले बोलले. ही संस्था 1965 पासून कार्यरत आहे. सर्वपक्षीय लोक संस्थेत व्यवस्थापन व संचालक पदावर आहेत. जनार्दन घोरपडे हे शिवसेनेचे आहेत. मनोहर आंबवडे हे उबाठाचे नेते आहेत. पण कुठल्याही प्रकारे सरकार व महाराष्ट्राला बदनाम करायचे आहे. यामध्ये फक्त भाजप किंवा संघाचे लोक नाहीत, तर सर्वपक्षीय लोक आहेत” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

आंदोलनाला नेमके कशासाठी आपण आलो होतो

“बदलापूरमधील रहिवाशांनी सांगितले की 10 वाजेपर्यंत आम्ही होतो. त्यानंतर दुसरे लोक आले. त्यांच्या हातात बॅनर आले. लाडकी बहिण योजना नको. नेमके कशासाठी आपण आलो होतो. बदलापूर घटनेत न्याय हवा की लाडकी बहिण योजना नको म्हणून आलो होतो?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

‘उज्ज्वल निकम नको, मग कपिल सिब्बल कसे चालतात’

“उज्ज्वल निकम यांच्या निवडीवर आक्षेप घेतात. मग कपिल सिब्बल कसे चालतात?. पीडितांच्या घरात जा, त्यांची मागणी असते की उज्ज्वल निकम सारखा वकिल हवा. त्यांनी आत्तापर्यंत एकाही गुन्हेगाराचे वकीलपत्र घेतले नाही. उद्धव ठाकरे व काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे, तेव्हा विश्वास होता. कोपर्डी घटना, 26/11 सारख्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी गुन्हेगारांची कंबर मोडली” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उज्वल निकम यांच्या निवडीचे समर्थन केले.

‘जीभ झडत कशी नाही?’

“कपिल सिब्बल खासदार असून चालतात, मग निकम का नाही?. दुटप्पी भूमिका तुम्हाला घेता येत नाही. गेल्या 70 वर्षांत इंग्रजांचे कायदे वापरत होतो. मोदींनी न्यायसंहिता आणली. बदलापूरच्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा नक्की होणार. नाना पटोले बोलतात, आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे. प्रणिती शिंदे बोलतात, बदलापूरमध्ये आंदोलकांनी आग लावली पाहिजे. काँग्रेस प्रवक्ते बोलतात मराठी माणसाने बलात्कार केला, जीभ झडत कशी नाही?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. चित्रा वाघ यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचून दाखवला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.