सरकारला जागं करण्यासाठी निघतोय, दोन्ही विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते आज पूरग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
मुंबई : राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते आज पूरग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या दोघांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. आजचा दौरा हा प्रशासनाला जागं करण्यासाठी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओल्या दुष्काळामुळे विदर्भ – मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे” असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं.
मराठवाडा, विदर्भात ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. सरकार वरातीमागून घोडे पळवत आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
फडणवीसांचा मराठवाडा दौरा, पंकजा मुंडे ‘अनवेल’
, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्याची घोषणा केलीय. फडणवीस हे वाशिम जिल्ह्यातून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात मराठवाड्याचाही समावेश असेल. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आजारी आहेत. पंकजा यांनी स्वत: याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. फडणवीसांकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे आता राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून आली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा केली आहे. वाशिममधून आपण तीन दिवसीय पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मराठवाड्यात मोठं नुकसान
दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठवाड्यात (Marathwada) तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती काल दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले.
राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.
1667 कच्ची घरे पडल्याची माहिती. 19 घरं पडल्याची माहिती. काल अनेक मंत्री मंत्रिमंडल बैठकीला उपस्थित नव्हते. ते आपआपल्या जिल्ह्यात होते, आपण पाहिले असेल अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहाणी केली होती. लातूर , बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादचे पालकमंत्री तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौ-यावर जाणार, असे मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
VIDEO : देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर
संबंधित बातम्या
औरंगाबादेत तिसऱ्यांदा आभाळ फाटलं, पहाटेतूनच कडाडणाऱ्या वीजांचा वर्षाव, नागरिकांची झोप उडाली
फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं