VIDEO: प्रदेश का नेता कैसा हो.. म्हणताच भाजपचा नेता स्टेजवरून धप्पकन पडला
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे. रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. (BJP leader falls off the stage front of shivraj singh chouhan)
भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात जनदर्शन रॅली सुरू केली आहे. रॅलीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जाऊन ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. सभांना संबोधित करत आहेत. खरगोन जिल्ह्यात एका कार्यक्रमात वेगळीच घटना घडली. शिवराज सिंह चौहान स्टेजवर आल्यानंतर अनेक नेते मंचावर चढले. त्यावेळी एका नेत्याने घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. प्रदेश का नेता कैसा हो.. असं त्याने म्हणताच तो स्टेजवरून कोसळला. या नेत्याला कोणताही मार लागला नाही. मात्र, नेता स्टेजवरून कोसळल्याने सभेत एकच हशा पिकला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
खरगोन जिल्ह्यातील खंडवा लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली. शिवराज सिंह चौहान यांची जनदर्शन रॅली झिरन्या ब्लॉक मुख्यालयात पोहोचली होती. या ठिकाणी सभेला संबोधित केल्यानंतर भीकनगावला जाताना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एका सभेला संबोधित केलं. शिवराज सिंह चौहान हे स्टेजवर येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी भीकनगावचे भाजप नेते जगदीश जायसवाल यांनी माईक हातात घेऊन नारेबाजी देण्यास सुरुवात केली.
चौहान स्टेजवर आले आणि
जगदीश जायसवाल घोषणाबाजी करण्यात प्रचंड व्यस्त होते. स्टेजवरून घोषणा देत देत ते पुढे सरकले. ते घोषणा देण्यात इतके व्यस्त होते की त्यांना स्टेज संपल्याचं लक्षातच आलं नाही. ते आणखी थोडे पुढे गेले. त्याचवेळी शिवराज सिंह चौहान स्टेजवर आले होते. त्यामुळे जायसवाल यांना अधिकच स्फूरण चढलं. त्यांनी आणखी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रदेश का नेता कैसा हो… असं म्हणत जायसवाल यांनी एक पाऊल पुढे टाकताच त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले.
सुदैवाने कोणतीही दुखापत नाही
जायसवाल कोसळल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ त्यांना उचललं. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, जायसवाल स्टेजवरून कोसळल्याने लोकांमध्ये एकच खसखस पिकली. या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ काढला होता. काहींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
#WATCH | Madhya Pradesh: A local BJP leader falls off the stage of an event which was organised for CM Shivraj Singh Chouhan in Khargone, following his ‘Jandarshan yatra’ from Jhiranya to Bhikangaon in Khargone district. CM Chouhan was also present on the stage. (27.09.2021) pic.twitter.com/GXQYNciWjC
— ANI (@ANI) September 29, 2021
संबंधित बातम्या:
(BJP leader falls off the stage front of shivraj singh chouhan)