महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे तीन तिघाडा, काम बिघाडा, गिरीश महाजनांचं टीकास्त्र
प्रत्येक विभागात राज्य सरकार विषयी नाराजी आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. (BJP Girish Mahajan Comment on Thackeray Government)
जळगाव : “मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि मराठी माणसासाठी काहीही करायचं नाही, अशी ठाकरे सरकारची भूमिका आहे. प्रत्येक विभागात राज्य सरकार विषयी नाराजी आहे,” अशी टीका भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. (BJP Girish Mahajan Comment on Thackeray Government)
“राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने तीन तिघाडा आणि काम बिघाडा असे काम या सरकारचे सुरु आहे. त्यामुळे या सरकारविषयी प्रत्येक स्तरावर, विभागात नाराजी आहे,” असेही गिरीश महाजन म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण संदर्भातील आंदोलकाना भेटायला तयार नाहीत. त्यांना यासाठी वेळ नाही. यांना फक्त निवडणुकीच पडलं आहे. कोण कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार, हेच विचार सध्या सरकार करत आहे,” असेही गिरीश महाजन म्हणाले.
महाजन आणि खडसेंमध्ये शाब्दिक युद्ध
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या शाब्दिक युद्ध रंगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर जळगावमध्ये भाजपला गळती लागली आहे. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंकडून सुरु असलेल्या या पक्षबांधनीबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना टोला लगावला होता.
“राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असे गिरीश महाजन म्हणाले होते. (BJP Girish Mahajan Comment on Thackeray Government)
संबंधित बातम्या :
जळगावात राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; खडसेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना