दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप

मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप
Milind Narvekar, Kirit Somaiya
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 2:18 PM

रत्नागिरी : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जात नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला. (BJP Leader Kirit Somaiya accuses Shivsena Secretary Milind Narvekar built Bungalow at Dapoli Ratnagiri without permission)

किरीट सोमय्यांचा आरोप काय?

“शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे.” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“सरकार परब-नार्वेकरांना पाठिशी घालतंय”

“एका बाजूला कोव्हिडमुळे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले बांधत आहेत. असे असताना सरकार मात्र या दोघांना पाठीशी घालत आहे” असा आरोप करत किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी दापोलीत दाखल झाले.

किरीट सोमय्या यांनी याआधी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याला या प्रकरणात लक्ष्य केल्याने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

संबंधित बातम्या :

अनिल परबांच्या अडचणी वाढणार? सोमय्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पथकाकडून परबांच्या रिसॉर्टची पाहणी

‘ही कमाल फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात!’ जमीन खरेदी प्रकरणात सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला

(BJP Leader Kirit Somaiya accuses Shivsena Secretary Milind Narvekar built Bungalow at Dapoli Ratnagiri without permission)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.