Kirit Somaiya : ‘अमिताभ गुप्ता पुणे पोलिस आयुक्त नाही, तर ठाकरे-पवारांचा एजंट’ सोमय्यांचा आरोप
Pune Kirit Somaiya : गेल्या शनिवारी याची तक्रार ककेल्यानंतर ज्यांनी कोविड पेशंटची हत्या केली, त्याबाबत गुन्हा का दाखल केला नाही, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय. कोविड पेशंटच्या रुग्णांसोबत खेळण्याच पाप ठाकरे सरकारनं केल्याचंही सोमय्या म्हणालेत.
पुणे : पुण्यात शुक्रवारी पुन्हा एकदा हायवोल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पुण्यात शुक्रवारी भाजप कार्यकर्ते (BJP workers in Pune) मोठ्या संख्येनं किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya Latest News) यांच्या समर्थनात पालिका कार्यालयाबाहेर जमले होते. पुणे पालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. तसंच पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अमिताभ गुप्ता पुणे पोलिस आयुक्त नसून, ते ठाकरे पवारांचे एजंट असल्यासारखे वागत असल्याची टीका यावेळी किरीट सोमय्या यांनी केली. लाईफलाईन हेल्थ केअर (Lifeline Health Care) कंपनीच्या नियुक्तीवरील घोटाळ्यावरुन पैसे लाटण्याचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यावरुन या सगळ्या वादाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या शनिवारी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पुण्यातील शिवसेना विरुद्ध भाजप असं वातावरण तापलं होतं.
सोमय्या काय म्हणाले?
गिरीश बापट हे देखील यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत होते. महापौर आणि पुणे पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी बोलतोना पुन्हा एकदा संजय राऊत, उद्धव ठाकरेवर निशाणा साधला. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की,…
संजय राऊत यांना माझी विनंती आहे, त्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी ही लाईफलाईन हेल्थ केअर ही कंपनी कुणाची आहे, याची स्थापना कधी झाली, या कंपनीचा पार्टनर कुणाचा बेनामी पार्टनर आहे..? या कंपनीला 100 कोटीचं कंत्राट देण्यात आलं..? या कंपनीनं कोविड सेंटर चालवताना किती लोकांचे मृत्यू झाले? त्या कंपनीवर उद्धव ठाकरे आता गुन्हा दाखल करणार का?
गुन्हा दाखल करण्याच वचन
पुणे महापालिका आयुक्त आणि महापौरांनी आम्हाला वच दिलंय की, ते ताबडतोब याबाबत गुन्हा दाखल करणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणालेत. गेल्या शनिवारी याची तक्रार ककेल्यानंतर ज्यांनी कोविड पेशंटची हत्या केली, त्याबाबत गुन्हा का दाखल केला नाही, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय. कोविड पेशंटच्या रुग्णांसोबत खेळण्याच पाप ठाकरे सरकारनं केल्याचंही सोमय्या म्हणालेत. दरम्यान, आता वाईनमधून ठाकरे सरकारनं कमाईला सुरुवात केलीये, असा टोलाही लगावला आहे.
64 जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
आजची संपूर्ण चर्चा ही खरंतर गेल्या शनिवारी व्हायला हवी होती, असं सोमय्या म्हणालेत. माझ्यावर शंभर गुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत आयुक्तांनी सांगितलं की सगळी चौकशी केली आहे. त्यांनी पुणे पोलिसांनाही स्टेटमेन्ट दिलंय, असंही सोमय्या म्हणालेत. माझ्यावर दगड मारणाऱ्यावर पोलिसानं काहीही एक्शन घेतली नाही, असा आरोप सोमय्यांनी केला असून आता आपल्यावर हल्ला करणाऱ्या 64 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, पुण्यात आज भाजप कार्यकर्ते, पोलिस आणि पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याच्या प्रकारावरही हात जोडून त्यांनी पत्रकारांची माफी मागितली.
पाहा व्हिडीओ – सोमय्या काय म्हणाले?
संबंधित बातम्या :
ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की त्याच पायऱ्यांवर सत्कार, पोलीस आणि कार्यकर्ते भिडले