हे कस काय शक्य आहे? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाला अवघ्या 14 महिन्यात मिळाली PhD डिग्री

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी फक्त 14 महिन्यातच ही पीएचडीची डिग्री मिळवली आहे.

हे कस काय शक्य आहे? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाला अवघ्या 14 महिन्यात मिळाली PhD डिग्री
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 10:32 PM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्यांची पीएचडीची डिग्री सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियात व्हायरल दाव्यांनुसार सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी अवघ्या 14 महिन्यात पीएचडी मिळवली आणि. या डिग्रीमुळे सोमय्या आणि त्यांच्या मुलावर जोरदार टीका होत आहे. यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

फाईल्स आणि कागदपत्रं दाखवून जवळपास दीड डझन नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मुलाच्या पीएचडीची पदवी वादात आली आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पदवीनुसार किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी फक्त 14 महिन्यातच ही पीएचडीची डिग्री मिळवली आहे.

व्हायरल कागदपत्रांनुसार किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठीचा प्रबंध सादर केला. प्रबंध सादर केल्यानंतरच्या अवघ्या दीड महिन्यातच नील सोमय्यांना तोंडी परीक्षेसाठी बोलावलं गेलं.

विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठाकडून नील सोमय्यांना पदवी प्रदान केली गेली.

पीएचडी पदवी प्रदान सोहळ्याचे काही फोटो किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. या फोटोंमुळेच सोमय्यांच्या पीएचडीची डिग्री बाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ज्या वेगानं पीएचडी झाली आणि ज्या वेगानं मुंबई विद्यापीठाकडून सोमय्यांच्या मुलाला पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्या वेगावरुन नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

यासंदर्भात दोन्ही बाजूनं दोन कागदपत्रं समोर आली आहेत. एक पीएचडीच्या पूर्वपरीक्षेचा कागद आहे. 17 सप्टेंबर 2016 ला सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांनी परीक्षा दिल्याचा दावा या द्वारे करण्यात आला आहे.

तर, दुसरा कागद हा नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे.ज्यात पीएचडी रेजिस्ट्रेशनची तारीख ही जून 2021 ची आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही करण्यात आली. मात्र, सारं काही नियमात झाल्याचा दावा केला जातोय.

विरोधकांनीही सोमय्यांच्या मुलाच्या पीएचडीच्या वेगावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर, स्वतः किरीट सोमय्यांनी 14 महिन्यांचा आरोप खोडत पीएचडीसाठी 72 महिने लागल्याचा दावा केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.