आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, आता कुणाला तुरुंगात टाकणार? भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातूनच जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी या कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. त्यावरुन भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, आता कुणाला तुरुंगात टाकणार? भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 3:06 PM

रायगड: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर आता भाजपनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे जळगावातील एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या या आत्महत्येला कोण जबाबदार? सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की परिवहन मंत्री अनिल परब यांना? असा सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. (BJP leader aggressive after ST employee’s suicide, questions to CM and Transport Minister)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गोस्वामी यांना नुकतंच तळोजा कारागृहात हलवण्यात आलं आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांनी आपल्याला पोलिसांकडून वारंवार मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप नेत्यांची आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज राज्यात विविध ठिकाणी आक्रोश आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातूनच जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी या कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप मृत मनोज चौधरी यांनी केला आहे. तशी सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली आहे. याच मुद्द्यावरुन राज्य सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री की परिवहन मंत्र्यांना? असा सवाल भाजप नेते किरिट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार राम कदम यांनी विचारला आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांचा प्रश्न निश्चित सुटेल- भुजबळ

ज्यावेळी कर्मचारी आत्महत्येचं पाऊल उचलतात तेव्हा प्रश्न नक्कीच गंभीर असतो. एस.टी. कर्मचाऱ्यांचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये असं आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

एस.टी. कर्मचाऱ्याची आत्महत्या

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार थकीत आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पगाराचा त्यात समावेश आहे. अशावेळी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुंम्बा गावातील रहिवासी मनोज चौधरी यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकारआहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला आहे.

संबंधित बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार थकीत!, कुर्ला डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

BREAKING | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन, अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त

BJP leader aggressive after ST employee’s suicide, questions to CM and Transport Minister

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.