VIDEO ‘आजपासून अमृता फडणवीस यांना मी मॅम नाही, माँ अमृता संबोधणार’, मुंबईतील भाजप नेत्याच वक्तव्य

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस सुद्धा यावेळी बोलल्या. 'लेटस बी पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट पोल्युशन' म्हणजे प्रदूषण करायचं नाही, उपाय शोधायचा. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मी कचरा करणार नाही अशी शपथ दिली.

VIDEO 'आजपासून अमृता फडणवीस यांना मी मॅम नाही, माँ अमृता संबोधणार', मुंबईतील भाजप नेत्याच वक्तव्य
Amruta Fadnavis
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 1:58 PM

मुंबईत अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्यादिवशी चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. विविध सामाजिक संस्था यामध्ये पुढाकार घेतात. काही सेलिब्रिटी, राजकारणी अशा मोहिमांमध्ये सहभागी होतात. आज मुंबईत एका चौपाटीवर असाच स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपा नेते मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे.

“अमृता फडणवीस यांनी बीच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलाय, तसं त्यांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठीपुढाकार घ्यावा” असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. “अमृता मॅमना मी विनंती करतो की, तुम्ही बीचवरचा कचरा साफ करता हे चांगलं काम आहे. अशीच महाराष्ट्राच्या राजकारणात घाण झालीय, ती साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्टाच राजकारण स्वच्छ करावं, यासाठी आपणास विनंती करतो” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अमृता फडणवीस यांनी काय शपथ दिली?

“अमृताताईंनी आता माँ च रुप घेतलय. आजपासून मी त्यांना मॅम नाही, माँ अमृता संबोधणार” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अमृता फडणवीस यांचं कौतुक करताना ते बोलून गेले. अमृता फडणवीस सुद्धा यावेळी बोलल्या. ‘लेटस बी पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट पोल्युशन’ म्हणजे प्रदूषण करायचं नाही, उपाय शोधायचा. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मी कचरा करणार नाही अशी शपथ दिली.

चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.