Mohit Kambhoj: “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, मोहित कंबोज यांचं राष्ट्रवादीसाठी ‘बॅड मॉर्निंग’ ट्विट!
NCP: भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीला टार्गेट करताना दिसत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिलाय.
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आता आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलंय. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात ईडी अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचं उत्तर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. कंबोज यांचं हे ट्विट राष्ट्रवादीची धाकधूक वाढणारं आहे. त्यांच्या या ट्विटमधून राष्ट्रवादीला ‘बॅड मॉर्निंग’ म्हटल्याचं दिसतंय.
हर हर महादेव !
हे सुद्धा वाचाअब तांडव होगा !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
तिसरा नेता कोण?
मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सीजे हाऊसमधील घरावराची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. वरळीमध्ये सीजे हाऊस ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांना काही जागा आणि रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचे कारण पुढे करून मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी प्रफुल्ल पटेलांची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आता प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधी काही नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. प्रफुल पटेल यांनाही तेव्हाच नोटीस देण्यात आली होती.