आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, भुजबळांवर कुणाची टीका?
छगन भुजबळ यांनी शाळेतील सरस्वतीच्या फोटोवरून केलेल्या वक्तव्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. हाच धागा पकडत नितेश राणेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय.
मुंबईः चेंबुरमधील व्यावसायिकाला धमकी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane) भुजबळांवर नाव न घेता टीका केली आहे. माँ सरस्वतीचा द्वेष करणाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलंय. आता देवी सरस्वतीही यांना वाचवू शकणार नाही, असा इशारा राणेंनी दिलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांविरोधात चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील व्यावसायिक ललितकुमार टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंद करण्यात आलाय.
भुजबळ आणि अन्य दोघांनी टेकचंदानी यांना फोन आणि मेसेजद्वारे धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे छगन भुजबळ अडचणीत सापडले आहेत.
या घटनेनंतर नितेश राणेंनी भुजबळांवर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट केलंय..
ट्विटमध्ये ते म्हणालेत, चेंबुरमधील बिझनेसमनला देवी सरस्वतीचा द्वेष करणाऱ्याने धमकी दिली. एफआयआर दाखल करण्यात आलंय. आता तर देवी सरस्वतीही वाचवू शकत नाही. हे हिंदुत्वाचं सरकार आहे, लक्षात ठेवा….
छगन भुजबळ यांनी शाळेतील सरस्वतीच्या फोटोवरून केलेल्या वक्तव्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Businessman from Chembur was threatened by Maa Sarasvati hating politician.. A FIR is lodged.. Ab toh Maa Sarvasvati bhi won’t save him.. It’s a Hindutuva Gov in Maharashtra now.. ye Yaad rakhna!!! @Dev_Fadnavis @mieknathshinde @MumbaiPolice
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2022
सर्व साळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त ३ टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या देवी सरस्वतीची पूजा कशासाठी करायची, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला होता. त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
भुजबळांनी यावर स्पष्टीकरणही दिलं. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी मत मांडलं होतं. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.
शाळेत पहिल्या दिवशी सरस्वतीची पूजा करतो. पण छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, अण्णासाहेब कर्वे अशा महापुरुषांची पूजा करत नाहीत. ते आपले देव आहेत. त्यांती पूजा का नाही, असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा केला.
भुजबळांचे हेच वक्तव्य वादात….
यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी भुजबळांवर निशाणा साधला.