बेळगावची मराठी जनता कुणाचं ऐकणार? राऊतांचं की फडणवीसांचं? राऊतानंतर आता फडणवीस दौऱ्यावर

नितीन गडकरी यांनी मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. | Sanjay Raut Nitin Gadkari

बेळगावची मराठी जनता कुणाचं ऐकणार? राऊतांचं की फडणवीसांचं? राऊतानंतर आता फडणवीस दौऱ्यावर
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 12:58 PM

बेळगाव: बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, या संजय राऊत यांच्या आवाहनानंतर भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा बेळगाव रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी गडकरींचा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याऐवजी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बेळगावात भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BJP leader Nitin Gadkari cancel Belgaum rally now Devendra Fadnavis will campagin for BJP)

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. भाजपने इथे ताकद लावली वा काँग्रेसने इथे ताकद लावली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ते राष्ट्रीय पक्ष आहेत. पण महाराष्ट्रातील नेत्यांनी मग कोणत्याही पक्षाचे असोत, इथे येऊन मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये. कोणीही असतील, मग ते काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे.

राष्ट्रवादी किंवा शिवसेना इथे मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करणे शक्यच नाही. इतकंच कशाला काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते इथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असं मला वाटत नाही. कारण सीमा प्रश्न आणि इथल्या मराठी माणसाशी आपण एका भावनेनं बांधले गेले आहोत. पण भाजपचे लोक आहेत त्यांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. पण मराठी म्हणून तरी इथल्या बांधवांच्या विरोधात जाण्याचे पाप तुम्ही करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.