Vinayak Mete: फडणवीसांचा हातात हात अन् पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार!, वाचा निवडणूक प्रचाराचा ‘तो’ किस्सा

Vinayak Mete : युतीचा भाग, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय, पण पंकजा मुंडेंचा कडाडून विरोध, वाचा बीडच्या राजकारणातील 'तो' निवडणूक किस्सा...

Vinayak Mete: फडणवीसांचा हातात हात अन् पंकजा मुंडेंच्या विरोधात प्रचार!, वाचा निवडणूक प्रचाराचा 'तो' किस्सा
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 2:59 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. कधी कोण कुणासोबत जाईल अन् कधी काय घडेल सांगता येत नाही. साल होतं 2019 अन् निवडणूक होती लोकसभेची. एव्हाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. प्रचार हळूहळू त्याचं विस्तारित रुप धारण करत होता. महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले होते. आघाडीने प्रचाराला सुरुवात केली होती. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मात्र काहीतरी वेगळंच सुरु होतं. प्रीतम मुंडे या युतीच्या उमेदवार होत्या तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात होते. विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) युतीचा महत्वपूर्ण भाग होते. शिवाय तत्वाकालिन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय होते.  पंकजा मुंडे (Pankaja Munde) तेव्हा महिला आणि बालकल्याणमंत्री होत्या. मेटे यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात रणशिंग फुंकलं होतं. अन् थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला होता.

युतीचा भाग पण पंकजांचा विरोध का?

युतीत असून देखील मेटे पंकजा मुंडेंचा विरोध का करत आहेत, असं अनेकांना वाटलं. एका मेळाव्या दरम्यान मेटेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांच्याकडून त्रास दिला जातो, असा थेट आरोप विनायक मेटे यांनी केला. आपण राज्यभर भाजपसोबत आहोत. पण बीड जिल्ह्यात भाजपचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असं विनायक मेटे यांनी मेळाव्यात जाहीर केलं. विनायक मेटे यांनी बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. निकाल प्रितम मुंडे यांच्या बाजूने लागला. पण विनायक मेटे यांच्या विरोधामुळे मुंडे भगिनींना जास्त कसरत करावी लागली एवढं मात्र खरं…

विनायक मेटेंचं निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडेंकडून शोक व्यक्त

खरोखरच विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. मला सकाळी स्वत: चंद्रकांत पाटील यांनी फोन करून याबाबत माहिती दिलीयं. मात्र, ते गंभीर असल्याचे सांगितले गेले होते अगोदर, माझी आणि त्यांची काही दिवसांपूर्वीच सागर बंगल्यावर भेट झाली होती, आम्ही बऱ्याच वेळ जिल्हातील प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच सोबत मिळून कसे काम करता येईल यावर देखील आमचे बोलणे झाले. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊ संघर्ष केला. ते चार वेळा आमदार होते. मलाच एकच वाटते की, त्याचे हे जाण्याचे वय नव्हते अत्यंत धडधाकट माणूस अपघातामध्ये जातो हे अत्यंत दुदैवच म्हणावे लागेल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.