भाजप नेत्यांकडून पंकजा नाराज नसल्याची सारवासारव, पण मुंडे समर्थकांची बैठकीला दांडीच

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज जालन्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. | Pankaja Munde

भाजप नेत्यांकडून पंकजा नाराज नसल्याची सारवासारव, पण मुंडे समर्थकांची बैठकीला दांडीच
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 12:55 PM

औरंगाबाद: पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून फेटाळण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना वैयक्तिक कारणांमुळे या बैठकांना उपस्थित राहिल्या नाहीत, अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांकडून सोमवारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी औरंगाबादमधील बैठकीला पंकजा मुंडे समर्थकांनी दांडी मारल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. (Pankaja Munde not attending party meeting in Jalna)

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज जालन्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मेघना बोर्डीकर आणि भागवतराव कराड हे नेतेदेखील उपस्थित आहेत. मात्र, पंकजा समर्थक नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

याविषयी विचारणा केली असता मेघना बोर्डीकर यांनी पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले. पंकजाताई त्यांचे महत्वाचे काम आल्यामुळे दिल्लीत गेल्या आहेत. त्यामुळे त्या आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नसल्याचे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले. तर भाजप नेते भागवतराव कराड यांनीही पंकजा मुंडे नाराज नसल्याचे स्पष्ट केले. पंकजा मुंडे यांची वैयक्तिक अडचण असल्यामुळे त्या बैठकीला आलेल्या नाहीत. कुठलीही नाराजी नाही. बाकी मला याबाबत काहीही माहिती नाही. पंकजा मुंडे नसल्या तरी प्रीतम मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे भागवतराव कराड यांनी सांगितले.

भाजपमध्ये पंकजा मुंडे दुर्लक्षितच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. मात्र, हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंडदेखलेच आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण, भाजपमधील काही नेत्यांकडून अजूनही पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम सुरुच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते. पण राज्य तर सोडाच मराठवाड्यातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षबांधणीसाठी मराठावाड्यात सक्रिय झाले आहेत. ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहेत. परंतु, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे, अशी शंका निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का?; संजय राऊत म्हणतात…

‘मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे’, पंकजा मुंडेंकडून पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

(Pankaja Munde not attending party meeting in Jalna)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.