Praveen Darekar : आता तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील; न्यायालयाच्या निर्णयावर दरेकरांची प्रतिक्रिया

भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे नव्या सरकारला दिलासा मिळाला असून, अनेकांचे गैरसमज दूर झाल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

Praveen Darekar : आता तरी संजय राऊत बेताल वक्तव्य थांबवतील; न्यायालयाच्या निर्णयावर दरेकरांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 2:34 PM

मुंबई : शिवसेनेने (shiv sena) बंडखोर आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने (Supreme court)  महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात कायदेशीर पेच निर्माण झाल्याने सुनावणीसाठी पाच सदस्यांचं घटनापीठ नेमण्यात यावं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्याचे त्यांनी म्हटले. न्यायालयाच्या निर्णयाधारे आमदारांना अपात्र घोषीत करण्यात येईल, हा जो त्यांचा गैरसमज होता तो दूर झाल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीकडून सरकारवर जो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तो अयशस्वी ठरल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एवढे सगळे ऐकल्यानंतर संजय राऊत आपले बेताल वक्तव्य थांबवतील असं वाटत होते. मात्र तसे होत नाही. संजय राऊत यांची भूमिका ही दुटप्पी भूमिका आहे. न्याय व्यवस्था कुणाच्या ही बाजूने नसते. न्यायव्यवस्थेवर विश्वास न दाखवणे म्हणजे घटनेवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे. अशा शद्बात दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेनेकडून मेट्रोचे कारशेड आरेमध्ये करण्यास विरोध होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो महत्त्वाची आहे. आपल्या अहंकार आणि हट्टापोटी कुणी प्रकल्पाला खीळ घालू नये. मुंबईकराच्या हितासाठी हा प्रकल्प सुरू आहे. आता यापुढे एकही झाड तोडायचे नाही, मग विरोध कशासाठी होत आहे? केवळ मुद्दामविरोध कारायचा म्हणून हा विरोध केला जात असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

मग तेव्हाच विरोध का केला नाही?

यावेळी प्रवीण दरेकर यांनी औरंगाबादच्या नामंतरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांचे बोलणं लुटुपुटूचे आहे. आज जे यश मिळत आहे, त्याने हे पक्ष भयभीत झाले आहेत. जर धाडस असते तर निर्णय होण्याआधीच विरोध केला असता असे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने एका आदिवासी महिलेला प्रतिनिधित्त्व दिले यासाठी मी मोदींचे आभार मानतो असेही दरेकर यांनी यावेळी म्हटले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.