नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं!, भाजपाचा हल्लाबोल
ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे, त्यावरही दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आधी 100 युनिट मोफट देण्याची घोषणा केली, आता म्हणाले सवलतीमध्ये देऊ, हे वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळणं आहे. हे सरकार जुलमी असून, राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण असल्याचा घणाघात दरेकरांनी केला आहे.
उस्मानाबाद: वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सुरु असलेले आरोप प्रत्यारोप थांबायचं नाव घेत नाहीत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ‘ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं, भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील’, असा खोचक टोला दरेकर यांनी नितीन राऊतांना लगावला आहे. (Pravin Darekar criticize energy minister Nitin Raut on electricity bill issue)
भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हानच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर आज उस्मानाबादमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना दरेकरांनी राऊतांवर जोरदार टीका केलीय. त्याचबरोबर बिलं तपासायला ऊर्जामंत्री काय टीसी आहेत का? असा सवालही दरेकर यांनी केला आहे.
ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे, त्यावरही दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आधी 100 युनिट मोफट देण्याची घोषणा केली, आता म्हणाले सवलतीमध्ये देऊ, हे वीज ग्राहकांच्या जखमेवर मिठ चोळणं आहे. हे सरकार जुलमी असून, राज्यात सध्या अस्थिरतेचं वातावरण असल्याचा घणाघात दरेकरांनी केला आहे.
वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे नुकसान करणार नाही- राऊत
वीजबिल माफीबाबत सरकार गंभीर असून, वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे 28 हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलाला माफी देऊ, असंही ते म्हणाले.भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हानच ऊर्जामंत्र्यांनी भाजपला दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारावर टीकास्त्र
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून पुन्हा एकदा शिरिष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे. बोराळकर यांच्या प्रचारादरम्यान दरेकरांनी सतिश चव्हाण यांच्यावरही तोफ डागली. चव्हाण यांना 12 वर्षे संधी दिली. मात्र, पदवीधारकांसाठी त्यांनी एकही ठोस काम केलं नाही. चव्हाण यांची कारकीर्द निष्क्रीय राहिली आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्यांनी एकही काम केलं नसल्याची टीका दरेकर यांनी केलीय.
संबंधित बातम्या:
वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत
आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करू; मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ: नितीन राऊत
Pravin Darekar criticize energy minister Nitin Raut on electricity bill issue