ST Workers Strike : ‘हिटलरशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, चर्चा करून प्रश्न सोडवावा’

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) हिटलरशाही पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारनं सहानुभूतीनं संप हाताळला पाहिजे, असे मत भाजपा नेते आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी मांडले.

ST Workers Strike : 'हिटलरशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, चर्चा करून प्रश्न सोडवावा'
प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 2:16 PM

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) हिटलरशाही पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा संप संवादाने सोडवायला हवा. कर्मचारी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे. तसेच सरकारनं सहानुभूतीनं संप हाताळला पाहिजे, असे मत भाजपा नेते आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी मांडले. सोलापुरात ते बोलत होते.

‘वीजेचा मोठी समस्या’ वीज सवलत नाही दिली, मोफत वीज देत नाहीत, शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. शेतकऱ्यांकडून बील हे टप्प्याटप्प्याने घ्यावे, मात्र वीजपुरवठा खंडित करू नये. यातून जे आंदोलन होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.

‘ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष’ ओबीसी आरक्षणा(OBC Reservation)संदर्भात बेजबाबदार आणि बेफिकीरपणा राज्य सरकारने केला आहे. मराठा आरक्षणा(Maratha Reservation)प्रमाणेच ओबीसी आरक्षणाबाबतही तेच केले आहे. सुप्रीम कोर्टा(Supreme Court)च्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच ओबीसी आरक्षणाला स्थगिती आली, असा आरोप त्यांनी केला. अध्यादेश काढणे हा केवळ वेळकाढूपणा आहे. फडणवीसांनी सुचवलेल्या पर्यायांचा विचार राज्य सरकारने केला नाही. ओबीसी आरक्षणाबाबत सर्व विरोधीपक्ष सोबत आहेत. तर निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

‘शिवसेनेचा केंद्रबिंदू काँग्रेस’ शिवसेना (Shiv Sena)काँग्रेसमध्ये गेलीय. आता यूपीएत गेली तर काय विशेष? अशी खोचक प्रतिक्रिया राहुल गांधी-संजय राऊत भेटी(Rahul Gandhi Sanjay Raut Meet)वर दरेकरांनी दिली आहे. शिवसेनेचा केंद्रबिंदू काँग्रेस झाला आहे, त्यामुळे शिवसेना आता काँग्रेस(Congress) भोवती पिंगा घालताना दिसतेय, असेही ते म्हणाले.

‘फडणवीस निष्कलंक’ देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)वर कोणतेही खटले टाका, काही फरक पडणार नाही. शंभर खटले टाकले तरी त्याला आम्ही भीक घालत नाही, जे खटले टाकायचे आहेत ते टाका. मात्र राज्याचे पाच वर्षे निष्कलंकपणे मुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती, कोणत्या जिल्ह्यात काय परिणाम होणार?; वाचा सविस्तर

Ashish Shelar: मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर शेलारांचा गंभीर आरोप

ओबीसींचे 27 टक्के आरक्षण रद्द, औरंगाबाद महानगरपालिकेवर काय परिणाम? खुल्या प्रवर्गातील किती जागा वाढणार?

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.