VIDEO: अजित पवारांसोबतच्या खासगी भेटीची राम शिंदेकडून अखेर कबुली, म्हणाले…
भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीच्या चर्चेवर भाष्य केलंय.
अहमदनगर : भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीच्या चर्चेवर भाष्य केलंय. आधी भेटच झाली नसल्याचं सांगणाऱ्या राम शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासगी भेटीची अखेर कबुली दिलीय. यावेळी त्यांनी भेटीचं कारणंही सांगितल्यानं मागील काही काळ सुरु असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. (BJP leader Ram Shinde comment on meeting with Ajit Pawar)
राम शिंदे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झाली. 20 जून रोजी माझ्या मुलीचं लग्न होतं. प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला, आजी माजी मंत्र्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. अजित पवार यांनाही मी भेटून निमंत्रण दिलं. सोशल मीडियात जी आमच्या बैठकीची चर्चा आहे त्यात कोणतंही तथ्य नाही. माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रणावरुन मी भेट घेतली होती.”
राम शिंदे आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत काय चर्चा?
दरम्यान, कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात होतं. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला गेला. दोन्ही नेत्यांनी सुरुवातीला या भेटीबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत फार माहिती नसल्याचं दिसलं. विशेष म्हणजे राम शिंदे यांनीही सुरुवातीला अशी कुठलीही भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कोण आहेत राम शिंदे?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेले राम शिंदे हे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये रोहित पवार यांचा विजय झाला होता.
हेही वाचा :
राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…
मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?
पंढरपूर पोटनिवडणूक मविआ सरकारची लिटमस टेस्ट : राम शिंदे
व्हिडीओ पाहा :
BJP leader Ram Shinde comment on meeting with Ajit Pawar