नागपुरात भाजपला खिंडार, 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. (BJP Leaders in Nagpur joins NCP)

नागपुरात भाजपला खिंडार, 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 4:10 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. (BJP Leaders in Nagpur joins NCP)

भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. पण यामुळे वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप सोडलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला. याचा वाडीच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भाजपला धक्क्यावर धक्के

भाजप नेते संजय साडेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती धरला. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.

कालिदास कोळंबकरांचे समर्थक शिवबंधनात

त्यानंतर शिवसेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग सुरु झालं आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

माजी आमदार हेमेंद्र मेहता शिवसेनेत

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

मुंबईतील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला धक्का; कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

भाजपला पुन्हा धक्का, दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

(BJP Leaders in Nagpur joins NCP)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.