AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांवरील हल्ले रोखा, फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा, भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन (BJP complaint against trollers) पोलिसांवरील हल्ले रोखा आणि ट्रोलर्सना आवरा या दोन मागण्या केल्या.

पोलिसांवरील हल्ले रोखा, फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा, भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी
| Updated on: May 02, 2020 | 2:09 PM
Share

मुंबई : भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन (BJP complaint against trollers) दोन मागण्या केल्या. राज्यभरात पोलिसांवर होणारे हल्ले रोखा तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून खालच्या भाषेत होणारे ट्रोलिंग रोखावं, अशी मागणी यावेळी भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली. (BJP complaint against trollers)

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा हे दुपारी एकच्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यलयात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय सोशल मीडियावरील ट्रोलर्सबाबतही त्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.

ट्रोलर्सना आवरा

सोशल मीडियावरील ट्रोलर्सविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत कायदेशीर मार्ग अवलंबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल गेलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. ट्रोलर्सना जरब बसावी आणि खालच्या भाषेत कमेंट करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांची आहे.

पोलिसांवर वाढते हल्ले

करोनाविरोधात लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेविका, पोलीस दिवस रात्र काम करीत आहेत. मात्र त्यांच्यावर अजूनही हल्ले होत आहे, त्यांना शिवीगाळ केली जात आहे. कुर्ला पश्चिम येथील गर्दी हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला नूर मोहम्मद बिल्डिंग , पाईप लाईन रोड कुर्ला येथे शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेबाबत कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

बांद्र्यात पोलिसांवरील हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांवर हल्ला झाल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वांद्रे इथल्या बेहरामपाडा गेट नंबर 18 इथं 28 एप्रिलला ही घटना घडली. प्रतिबंधित ठिकाणी भाजीची गाडी लावणाऱ्याला रोखल्याने, पोलिसाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय कुर्ला, गोवंडी आणि इतर ठिकाणीही पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपने केली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.