देवेंद्र फडणवीस यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्व लवकरच घोषणा करण्याची चिन्हं

देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशाल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. Devendra Fadnavis may get new roll for Bihar election

देवेंद्र फडणवीस यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता, केंद्रीय नेतृत्व लवकरच घोषणा करण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 1:32 PM

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांना संघटन कौशल्यामुळे बिहारमध्ये नवी जबाबदारी मिळू शकते. बिहारचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहू शकतात. केंद्रीय नेतृत्त्वाला त्याबाबत विश्वास वाटतो. (Devendra Fadnavis may get new role for Bihar election)

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकतं.

भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढल्या होत्या. महाराष्ट्रात भाजपने सत्ता स्थापन केली नसली, तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याबाबत केंद्रातील नेत्यांना विश्वास आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये नवी जबाबदारी दिली जाऊ शकते.

बिहार विधानसभा निवडणूक

बिहारमध्ये 243 जागांसाठी विधानसभा निवडणूक होत आहे. बिहार विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होणार हे निश्चित आहे. सध्या असलेलं कोरोनाचं संकट पाहता, या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती, मात्र ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली.

सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यांच्यात काडीमोड झाल्याने, त्यांनी पुन्हा भाजपची मदत घेऊन सरकार स्थिर केलं.  त्यामुळे जेडीयू-भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राजद अशी लढत बिहारमध्ये पाहायला मिळू शकते.

(Devendra Fadnavis may get new role for Bihar election)

संबंधित बातम्या 

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सारवासारव   

Happy Birthday Devendra Fadnavis | भारतातील युवा महापौर ते मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचा रंजक प्रवास 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.