मनसे, शिंदे गटाच्या जवळीकतेने भाजप सावध!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मेगा प्लॅन तयार?
महायुतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सावध पाऊले उचलल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र भाजपाची ही भूमिका शिंदे गट मान्य करणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई : राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीसाठी मनसे (MNS), भाजप (BJP) आणि शिंदे गट यांची महायुती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र दुसरीकडे महायुतीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सावध पाऊले उचलल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेवर भाजपाचाच महापौर बसावा यासाठी भाजपचा प्रयत्न चालू आहे. यासाठी आता भाजपकडून मेगा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुती झाल्यास शिंदे गटाच्या कोट्यातून मनसेला जागा मिळाव्यात असा हा भाजपाचा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे गट आणि मनसेने युतीत लढावं अशी भाजपाची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपची सावध भूमिका?
काही दिवसांपासून मनसे, शिंदे गट आणि भाजप महायुतीची चर्चा सुरू आहे. मात्र राज ठाकरे -शिंदे गट यांच्या जवळकीनंतर भाजपाने सावध भूमिका घेत मेगा प्लॅन तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर व्हावा यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभू्मीवर भाजपाने मेगा प्लॅन आखल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाने आपल्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्यात असा हा प्लॅन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीची चर्चा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ठाकरे गटाला रोखण्यासाठी मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये महायुती होणार असल्याची चर्चा आहे. मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीनही नेते एकत्र दिसले होते. तेव्हापासून महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.